UGC NET 2024 registration : राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच यूजीसी नेट परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख आहे. नेट परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज संपणार आहे . ज्या उमेदवारांनी काही कारणास्तव अर्ज दाखल केले नसतील, ते आज दिवसभरात अर्ज दाखल करु शकतात. यापूर्वी १० मे ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती. मात्र, ती वाढवून १५ मे करण्यात आली असल्याचं UGC नी जाहीर केलं होतं. राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नेट परीक्षा ही सहायक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा म्हणून घेतली जाते.


नेट परीक्षेसासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन स्वरूपात असणार आहे.  त्याचबरोबर शुल्क भरण्याची अंतिम तारीख १६ आणि १७ मे ठेवण्यात आली आहे.  उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जामध्ये त्रुटी असल्यास त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी देखील तारखा देण्यात आल्या आहेत. १८ मे ते २० मे या कालावधीत अर्जामध्ये दुरुस्ती करता येणार आहे. 


कधी होणार परीक्षा ?


आधी ही परीक्षा १६ जून या तारखेला होणार होती. मात्र, आता सुधारित तारखेनुसार १८ जून २०२४  रोजी ही परीक्षा पार पडणार आहे.


किती असणार परीक्षा शुल्क ?


खुल्या प्रवर्गासाठी ११५० रुपये इतके शुल्क असणार आहे. आरक्षित असलेल्या प्रवर्गांसाठी ३२५ रुपये परीक्षा शुल्क असणार आहे. परीक्षा शुल्क केवळ ऑनलाइन स्वरूपात भरता येणार आहेत. यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग इत्यादींचा वापर करता येणार आहे . उमेदवारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी यूजीसी कडून ईमेल आयडी आणि दूरध्वनी क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. अर्ज दाखल करण्याबरोबरच शुल्क भरण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी नॅशनल टेस्टींग एजन्सीच्या यूजीसी नेट परीक्षा वेबसाईटला भेट द्या. 



विद्यापीठ अनुदान आयोगाच्यावतीनं नॅशनल टेस्टींग एजन्सी ही परीक्षा घेत असते. ही परीक्षा सहायक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा.  या परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार देशभरात सहाय्यक प्राध्यापक पदांकरिता अर्ज दाखल करू शकतात.  गेल्या काही दिवसांपासून या परीक्षेच्या अर्ज दाखल करण्याच्या तारखा, परीक्षेच्या तारखा या सगळ्यांबाबत स्पष्टता नव्हती. मात्र, आता अखेर UGC ने या संदर्भात स्पष्टता देऊन अर्ज दाखल करणे, परीक्षा शुल्क भरणे, त्रुटी दुरुस्ती करणे आणि प्रत्यक्ष परीक्षा या सगळ्यांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये असलेली संभ्रमावस्था दूर झाली असल्याचे चित्र आहे.


इतर बातम्या :


Rohit Sharma : करिअरमधील अभिमानास्पद क्षण कोणता? रोहितनं 17 वर्षापूर्वींचा प्रसंग सांगत मनं जिंकली

 

CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या

 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI