मुंबई : अखेर सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची (CBSE Board 10th Result) प्रतीक्षा संपली आहे. सीबीएसई बोर्डाने दहावीचा निकाल सोमवारी 13 मे रोजी जाहीर केला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (Central Board of Secondary Education) म्हणजेच सीबीएसई बोर्डाने (CBSE Board) दहावीचा निकाल (10th Result 2024) जाहीर केला आहे. सीबीएसई बोर्डाने सोमवारी दहावीचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थी सीबीएसई (CBSE) बोर्डाचा इयत्ता 10वीचा निकाल  cbse.gov.in किंवा cbseresults.nic या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात.


CBSE बोर्डात दहावीला 21 लाख विद्यार्थी


CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल 2024 च्या निकालाची टक्केवारी 93.6% आहे. परीक्षेला बसलेल्या एकूण परीक्षार्थींची संख्या 22,38,827 आहे. यापैकी 20,95,467 उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. या वर्षी, सुमारे 21 लाख विद्यार्थी CBSE बोर्ड परीक्षा 2024 ला बसले होते. ऑनलाइन मार्कशीट्स तात्पुरत्या असतील. विद्यार्थ्यांना मूळ मार्कशीट आणि प्रमाणपत्रे नंतर शाळा प्रशासनाकडून मिळेल.


CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर


सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल 2024 ऑनलाइन तपासण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. CBSE बोर्ड निकाल 2024 पाहण्यासाठी आणि मार्कशीट डाउनलोड करण्यासाठी येथे दिलेली अधिकृतवेबसाइट्सची यादी पाहा. येथे तुम्ही निकाल पाहू शकता. विद्यार्थी CBSE निकाल 2024 इयत्ता 10 ची गुणपत्रिका खालील ऑनलाइन पोर्टलवर डाउनलोडही करू शकतात.



  • cbse.gov.in

  • cbse.nic.in

  • cbseresults.nic.in


CBSE निकाल 2024 ऑनलाइन कसा तपासायचा?


CBSE बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स कराव्या लागतील.



  • स्टेप 1 : सीबीएसई बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही results.cbse.nic.in किंवा www.cbse.nic.in यापैकी कोणत्याही एका वेबसाईटवर जात. 

  • स्टेप 2 : मुख्यपृष्ठावर गेल्यानेतर तिथे CBSE 10वी निकाल 2024 लिंकवर क्लिक करा.

  • स्टेप 3 : रोल नंबर, शाळा क्रमांक, केंद्र क्रमांक आणि प्रवेशपत्र आयडी सबमिट करा.

  • स्टेप 4 : आता तुम्हाला CBSE बोर्डाचा निकाल 2024 स्क्रीनवर दिसेल.

  • स्टेप 5 : तात्पुरती मार्कशीट शकता आणि डाउनलोड करु शकता.


 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI