UPSC Prelim:  केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी)  येत्या 2025 वर्षात होणाऱ्या विविध पदांसाठी भरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.  आयोगाच्या संकेतस्थळावर वेळापत्रत   प्रसिद्ध करण्यात आले आहे.  त्यानुसार पूर्व परीक्षा 25 मे ला होणार आहे.  उमेदवारांना upsc.gov. in या संकेतस्थळवर  वेळापत्रक उपलब्ध आहे.


यूपीएससी पूर्वपरीक्षेचं वेळापत्रक जाहीर  केलेल्या वेळापत्रकानुसार सर्व्हिस प्रिलिम्स परीक्षा 2025 आणि आयएफएस (इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस) 2025 चे आयोजन 25 मे 2025 रोजी करण्यात आली आहे. या संदर्भातील अधिसूचना 22 जानेवारी 2025 ला जारी करण्यात येईल.उमेदवारांना 11 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे.  केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) 2025  मध्ये होणाऱ्या नागरी सेवा परीक्षेसह विविध पदांसाठी भरती परीक्षांचे वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.


25  मे रोजी पूर्वपरीक्षा


संयुक्त जिओ-सायंटिस्ट, इंजिनिअरिंग सव्हिसेस, सीबीआय, सीआयएसएफ, एनडीए, सीडीएस, आयईएस/आयएसएस आणि इतर - परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. तर मुख्य परीक्षा 22 ऑगस्ट पासून सुरू होणर आहे.   उमेदवारांना नागरी सेवा आणि भारतीय वनसेवा पूर्वपरीक्षा 2025 साठी 22 जानेवारी ते 11 फेब्रुवारी 2025 या कालावधीत नोंदणी करता येईल. 25  मे रोजी पूर्वपरीक्षा होईल. नागरी सेवा मुख्य परीक्षा 22 ऑगस्ट तसेच वनसेवा मुख्य परीक्षा 16 नोव्हेंबरला सुरू होईल.


मुख्य परीक्षा 22 ऑगस्टपासून


अभियांत्रिकी सेवा प्राथमिक परीक्षेसाठी 18 सप्टेंबर ते  8 ऑक्टोबर 2024 या कालावधीत अर्ज करता येतील.   9 फेब्रुवारी 2025 रोजी पूर्वपरीक्षा होईल. 26  जूनला मुख्य परीक्षा पार पडेल. संयुक्त जीओ सायंटिस्ट पूर्वपरीक्षा 9 फेब्रुवारी 2025 रोजी, तर मुख्य परीक्षा 21  जून रोजी आहे. संयुक्त वैद्यकीय सेवापरीक्षा  20 जुलैला होणार आहे. इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस  (पीटी) परीक्षा 2025 चे आयोजन 9 फेब्रुवारी आणि संयुक्त भू वैज्ञानिक परीक्षेचे आयोजन देखील 9 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. मुख्य परीक्षा 21 जून रोजी होणार आहे. नागरी सेवेची मुख्य परीक्षा 22 ऑगस्टपासून 5 दिवस असणार आहे.  


यूपीएससीच्या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन


स्पर्धा परीक्षांची तयारी उमेदवारांना योग्य रितीने करता येण्यासाठी, परीक्षांचा अंदाज येण्यासाठी यूपीएससीकडून दरवर्षी  वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते.   उमेदवारांनी अधिक माहितीसाठी यूपीएससीच्या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


हे ही वाचा :


UPSC Result : मुलाखतीच्या आधी आईचं निधन, खचली नाही अन् डगमगलीही नाही; इंदापूरची शामल भगत 24 व्या वर्षी बनली कलेक्टर


                            


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI