SSC Result 2023: आपल्या अपंगत्वावर मात करत मिरा रोडच्या मांताशा हुसैन या मुलीने दहावीत 81 टक्के मार्क मिळवून एक आदर्श निर्माण केला आहे. दिव्यांगावर हताश होऊन अर्धवट शिक्षण सोडलेल्या आपल्याच मित्रांना तिने जिद्दीने यश कसं मिळवायचं याचा आदर्शच समोर ठेवला आहे. 


मांताशा इरफान हुसैन हिच्या 90 टक्के शरीराने तिला साथ न देण्याचं जन्मतःच ठरवलं होतं, मात्र तिने घरच्यांच्या आणि शिक्षकांच्या मदतीने यशाचं शिखर गाठलं आहे. तिने कधीच हार मानली नाही आणि दहावीत 81 टक्के गुणांनी उत्तीर्ण होऊन समाजासमोर आणि दिव्यांग मुलांसमोर एक आदर्शच उभा केला आहे. मिरा रोडच्या आश्मी प्लाझा या सोसायटीत मांताशा आपल्या आई-वडिलांसह राहते. मांताशा जन्मत: दिव्यांग आहे, तिला सी.पी. म्हणजेच, स्पस्टिक क्वाड्रिप्लेजिक सेरेब्रल पाल्सी (spastic Quardriplegic Cerbral palsy) हा आजार जन्मतःच होता. 


या आजारात तिचे दोन्ही हात आणि पाय काम करत नाही, तिचे 90 टक्के शरीर अंपग आहे. दिव्यांग असूनही मांताशा लहानपणापासून फारच सकारात्मक आहे. तिला एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी घरच्यांची मदत घ्यावी लागते. आठवीपर्यंतचं शिक्षण तिने मिरा रोडच्या सेंट अँन्थोनी शाळेतून घेतलं. आठवीनंतर दुसऱ्या मजल्यावर वर्ग गेल्याने तिने घरुनच शिक्षण घेण्याच ठरवलं.


मांताशाचे वडील तिला बाईकवर बसवून शाळेत सोडायचे. शाळेत तिच्यासाठी स्वतंत्र अशी खुर्ची बनवण्यात आली होती, तिच्या घरी देखील तिला स्वतंत्र खुर्ची बनवण्यात आली आहे. पुढे अभिनव कॉलेजमधून तिने दहावीचा प्राइव्हेट फॉर्म भरुन राईटरच्या (Writer) मदतीने दहावीचा पेपर दिला आणि तिला घवघवीत यश मिळालं. तिच्या या यशाने आई-वडिलांसह ती स्वत: खूप खुश आहे. मांताशाला आता स्टॉक मार्केटमध्ये आपलं करिअर घडवायचं आहे.


ठाण्यातील सिग्नल शाळेच्या मुलाचीही अशीच कहाणी


 ठाण्यातील सिग्‍नलवर पुर्वाश्रमी आणि भिक्षेकरी मुलांची एक शाळा भरते आणि त्याच शाळेचा विद्यार्थी किरण काळे दहावीची परिक्षा 60 टक्क्‍यांनी उत्‍तीर्ण झाला. वडील नसलेला किरण काळे आठ वर्षांचा असताना सिग्‍नल शाळेत दाखल झाला होता.  ठाण्याच्या तीन हात नाक्‍याखाली वडील नसलेला किरण आपल्‍या आईसोबत निर्वासित आयुष्‍य जगत होता. सिग्‍नल शाळेमुळे वयाच्‍या आठव्‍या वर्षी त्‍याला शाळेचे विश्‍व गवसले. किरणची आई मीना काळे ही निरक्षर असून गोखले रोडवर गजरे विकण्‍याचा व्‍यवसाय करते. पुढील शिक्षण घेऊन पोलीस ऑफिसर बनण्याचे किरणचे स्वप्न आहे. त्याला चांगले शिकून आईसाठी एक घर घ्‍यायचे आहे.


सविस्तर वाचा:


Thane: सरस्‍वती सेकंडरी व्‍हाया सिग्‍नल शाळा; किरण काळे दहावीत 60 टक्‍यांनी उत्‍तीर्ण


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI