SSC Board Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (SSC Board Result 2025) घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. यंदा दहावीचा निकाल 94.10 %, कोकण विभागाची बाजी 98.82 टक्के, नागपूर सर्वात कमी 90.78 टक्के निकाल लागला आहे. यंदाही राज्यात मुलींनीच बाजी मारली आहे. आज दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना बोर्डाच्या आणि अन्य संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येईल. बारावीनंतर आता दहावीच्या परीक्षेतही यंदा नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली आहे. यंदा राज्यात 96.14 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलं उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही 92.31 इतकी आहे. उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात मुली मुलांपेक्षा 3.83 ने पुढे आहेत. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे पत्रकार परिषद घेऊन निकालाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
24 विषयांचा निकाल 100 टक्के-
मंडळाच्या नऊ विभागांमधून 15 लाख 58 हजार 20 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 लाख 46 हजार 579 परीक्षेला बसले होते. त्यापैकी 14 लाख 55 हजार 433 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्याची टक्केवारी 94.10 टक्के इतकी आहे. सर्व विभागीय मंडळातून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 98.82 टक्के इतका लागला. तर सर्वात कमी निकाल नागपूरचा म्हणजे 90.78 टक्के इतका लागला. दहावीच्या परीक्षेत एकूण 62 विषयांची परीक्षा घेण्यात आली होती. त्यापैकी 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
महाराष्ट्रातील कोणत्या विभागाचा निकाल किती टक्के?
कोकण - 98.82 टक्केकोल्हापूर - 96.78 टक्केमुंबई - 95.84 टक्केपुणे - 94.81 टक्केनाशिक - 93.04 टक्केअमरावती - 92.95 टक्केसंभाजीनगर - 92.82 टक्केलातूर - 92.77 टक्केनागपूर - 90.78 टक्के
यंदाही लातूर पॅटर्न-
यंदा 211 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. यामध्ये सर्वाधिक 100 टक्के गुण मिळालेले विद्यार्थी लातूर जिल्ह्यातील आहे. लातूर जिल्ह्यात एकूण 113 जणांना 100 टक्के गुण मिळाले आहेत.
विभाग आणि 100 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या-
पुणे -13नागपूर-3संभाजीनगर-40मुंबई-8कोल्हापूर-12अमरावती-11नाशिक-2लातूर-113कोकण-9
दहावीच्या निकालाची निकालाची टक्केवारी घसरली-
यंदा दहावीचा निकाल गेल्यावर्षीपेक्षा कमी लागला आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा 1.71 टक्के कमी विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
2022- 96.94 टक्के
2023- 93.83 टक्के
2024- 95.81 टक्के
2025- 94.10 टक्के
निकाल कुठे पाहाल?
- https://results.digilocker.gov.in
- https://sscresult.mahahsscboard.in
- http://sscresult.mkcl.org
- https://results.targetpublications.org
राज्यातील दहावीचा निकाल जाहीर,VIDEO:
संबंधित बातमी:
SSC result 2025: दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर, कोकण विभाग अव्वल, मुंबईचा निकाल 95.84 टक्के
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI