Maharashtra SSC Exam: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या शालान्त प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षेचा निकाल (SSC Result 2025) मंगळवारी जाहीर करण्यात आला. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे पत्रकार परिषद घेऊन निकालाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. त्यानुसार मंडळाच्या नऊ विभागांमधून 15 लाख 58 हजार 20 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 लाख 46 हजार 579 परीक्षेला बसले होते. त्यापैकी 14 लाख 55 हजार 433 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्याची टक्केवारी 94.10 टक्के इतकी आहे. सर्व विभागीय मंडळातून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 98.82 टक्के इतका लागला. तर सर्वात कमी निकाल नागपूरचा म्हणजे 90.78 टक्के इतका लागला. दहावीच्या परीक्षेत एकूण 62 विषयांची परीक्षा घेण्यात आली होती. त्यापैकी 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे प्रत्येक विषयातील गुण पाहायला मिळतील. त्यानंतर विद्यार्थ्यांना आपपाल्या शाळेत त्यांची गुणपत्रिका मिळेल. यानंतर अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल.
कोणत्या विभागाचा निकाल किती टक्के?
पुणे -९४.८१ टक्के नागपूर- ९०.७८ टक्केसंभाजीनगर- ९२.८२ टक्केमुंबई-९५.८४ टक्केकोल्हापूर- ९६.७८ टक्के अमरावती-९२.९५ टक्केनाशिक- ९३.०४लातूर-९२.७७कोकण- ९९.८२
यंदाही दहावीच्या परीक्षेत मुलींची बाजी
बारावीनंतर आता दहावीच्या परीक्षेतही यंदा नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली आहे. यंदा राज्यात 96.14 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलं उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही 92.31 इतकी आहे. उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात मुली मुलांपेक्षा 3.83 ने पुढे आहेत.
SSC Exam: दहावीच्या निकालाची निकालाची टक्केवारी घसरली
यंदा दहावीचा निकाल गेल्यावर्षीपेक्षा कमी लागला आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा १.७१ टक्के कमी विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
२०२२- ९६.९४ टक्के२०२३-९३.८३ टक्के२०२४- ९५.८१ टक्के२०२५- ९४.१० टक्के
SSC Result 2025: राज्यातील 285 विद्यार्थ्यांना 35 टक्के
राज्यातील शिक्षण मंडळाच्या एकूण 9 विभागांमध्ये 285 विद्यार्थी हे काठावर पास झाले आहेत. या विद्यार्थ्यांना 35 टक्के मिळाले आहेत. 35 टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या पुण्यात आहे. तर कोकणाचा निकाल अव्वल असून कोकणात एकाही विद्यार्थ्याला 35 टक्के मिळालेले नाहीत.
पुणे -५९नागपूर-६३संभाजीनगर-२६मुंबई-६७कोल्हापूर-१३अमरावती-२८नाशिक-९लातूर-१८कोकण-० SSC Exam: दहावीचा ऑनलाईन निकाल कुठे पाहाल?
- https://results.digilocker.gov.in
- https://sscresult.mahahsscboard.in
- http://sscresult.mkcl.org
- https://results.targetpublications.org
आणखी वाचा
Maharashtra SSC Board Result 2025 Live: यंदाचा दहावीचा निकाल 94.10 टक्के; निकाल कुठे पाहता येणार?
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI