Raid 2 Box Office Collection: अजय देवगण (Ajay Devgn) आणि वाणी कपूर (Vaani Kapoor) यांचा नुकताच प्रदर्शित झालेला फ्रँचायझी चित्रपट 'रेड 2'नं सोमवारी, बाराव्या दिवशी चांगली कमाई केली. सहसा, इतक्या दिवसांनंतर, या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या अनेक चित्रपटांनी जवळजवळ गाशा गुंडाळला, पण 'रेड 2' (Raid 2 Movie) अजूनही बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) आपलं वर्चस्व राखलं आहे. बाराव्या दिवशीही या चित्रपटाला भरघोस कमाई केली.
या महिन्यात 1 मे 2025 रोजी प्रदर्शित झालेला 'रेड 2' हा चित्रपट या वर्षातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या चित्रपटांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. सुमारे 120 कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटानं आता देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर हा आकडा ओलांडला आहे. 'रेड 2' परदेशातही चांगली कमाई करत आहे.
'रेड 2'ची दुसऱ्या सोमवारीही जोरदार कामगिरी
सॅक्निल्कच्या अहवालानुसार, 'रेड 2' चित्रपटानं दुसऱ्या सोमवारीही आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे आणि सुमारे 5 कोटी रुपये कमावले आहेत. एकूणच, चित्रपटानं आतापर्यंत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 125.75 कोटींचा टप्पा गाठला आहे.
'सिंघम अगेन' आणि 'शैतान'ही मागे
जर आपण 'रेड 2' च्या बाराव्या दिवसांच्या कलेक्शनची तुलना अजय देवगणच्या 'सिंघम अगेन' या हिट चित्रपटाशी केली तर हा नवा चित्रपट या बाबतीतही पुढे गेला आहे. 'सिंघम अगेन'नं बाराव्या दिवशी फक्त 3.5 कोटी रुपये कमावले, तर 'रेड 2'नं 5 कोटी रुपये कमावले आहेत. तसेच, अजय देवगणच्या 'शैतान' या हिट चित्रपटानंही बाराव्या दिवशी फक्त 3 कोटी रुपये कमावले आहेत.
'रेड 2'नं जगभरात किती कमाई केली?
जर आपण चित्रपटाच्या लाईफटाईम कलेक्शनबाबत बोलायचं झालं तर, 'रेड 2'नं अकरा दिवसांत जगभरात 162.75 कोटींची कमाई केली आहे, तर सोमवारपर्यंत हे कलेक्शन 169 कोटींच्या जवळपास पोहोचली आहे. तर परदेशात त्याची कमाई सुमारे 20 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. अकरा दिवसांत भारतात चित्रपटाचं एकूण कलेक्शन सुमारे 143.75 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.