SBI Clerk Admit Card 2021 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)ने ज्युनियर एसोसिएट (क्लर्क)च्या 5000 जागांसाठी होणाऱ्या परीक्षेचं प्रवेशपत्र जारी केलं आहे. ज्या उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत. ते स्टेट बँक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट https://sbi.co.in वर जाऊन प्रवेशपत्र (Admit Card) डाऊनलोड करु शकतात. त्यासाठी उमेदवारांना आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड द्यावा लागेल. जाणून घेऊया परीक्षेचं प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची प्रक्रिया. दरम्यान, या परीक्षा पुढच्या महिन्यात घेतल्या जाणार आहेत. 


प्रवेशपत्र असं करा डाऊनलोड : 


1. सर्वात आधी तुम्हाला https://ibpsonline.ibps.in/sbijascapr21/clpeta_may21/login.php?appid=446c439024467117c52ef46db9717009 या लिंकवर क्लिक करावं लागेल. 


2. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर प्रवेशपत्र (Admit Card) डाऊनलोड करण्यासाठी एक विंडो ओपन होईल. ही विंडो तुमच्या स्क्रिनच्या डाव्या बाजूला येईल. 


3. या विंडोमध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड आणि केप्चा कोड टाकावा लागेल. भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करताना जो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड देण्यात आला आहे, तोच याठिकाणी द्यावा लागेल.  


4. ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर ओके बटणावर क्लिक करा, त्यावेळी तुमचं प्रवेशपत्र स्क्रिनवर ओपन होईल. 


5. आता तुम्ही तुमच्या परीक्षेचं प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकता. प्रवेशपत्र डाऊनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट काढायला विसरु नका. 


या गोष्टी लक्षात ठेवा : 


तुम्ही अॅडमिट कार्ड डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये देण्यात आलेल्या अटी-शर्तींना व्यवस्थित वाचून घ्या. कोरोनामुळे परीक्षा केंद्रांवर अनेक कठोर नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जे प्रत्येक परीक्षार्थ्यानं पाळणं बंधनकारक असणार आहे. तसेच तुम्हाला परीक्षा केंद्रावर काही वेळ आधीच पोहोचावं लागेल. त्याचबरोबर परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वी प्रवेश पत्राची प्रिंट काढण्यास विसरु नका. याव्यतिरिक्त परीक्षेच्या सर्व नियमांचं पालन करा. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊ शकता. https://sbi.co.in


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


UPSC NDA II Exam 2021 : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून अधिकृत अधिसूचना जारी; 400 पदांसाठी भरती, वाचा सविस्तर


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI