मुंबई : काल (मंगळवारी) मुंबई विद्यापीठाच्या विद्यापरिषद बैठक पार पडली. यामध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊन त्याबाबत निर्णय घेण्यात आले. मुंबई विद्यापीठात या शैक्षणिक वर्षांपासून विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांची सुरुवात होत आहे. विद्यापीठ पातळीवर विविध विषयांना एका छत्राखाली आणण्यासाठी स्कूल संकल्पना राबवली जाणार आहे. विविध विद्याशाखाअंतर्गत असणाऱ्या विषयांची ओळख आणि ते विषय शिकण्याची संधी यानिमित्ताने विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकेल. शिवाय, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखाअंतर्गत अभियांत्रिकीच्या शिक्षणात आमुलाग्र बदल घडून येणार आहेत. क्षेत्रीय भाषांमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण देण्याच्या एआयसीटीच्या शिफारशीलाही कालच्या विद्या परिषदेमध्ये मंजूरी देण्यात आली. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या सलंग्नित महाविद्यालयांमध्ये लवकरच मराठी भाषेमध्ये अभियांत्रिकेचे धडे गिरवले जाणार आहेत. 

Continues below advertisement


स्कुल संकल्पनेमध्ये  स्कूल ऑफ इंडियन लँग्वेजेस, स्कूल ऑफ इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस, स्कूल ऑफ सोशल सायन्सेस आणि स्कूल ऑफ पर्फॉर्मिंग आर्ट्स अशा विविध स्कूल्सची स्थापना करण्यासाठी कालच्या विद्या परिषदेमध्ये मंजूरी देण्यात आली. त्याचबरोबर औद्योगिक गरजा लक्षात घेऊन अभियांत्रिकीच्या आठ शाखांमध्ये उद्योन्मुख नवीन विषयांच्या अभ्यासक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे. ज्यामध्ये आर्टीफिशिअल इंटेलिजेंस अँड डेटा सायन्स, आर्टीफिशिअल इंटेलिजेंस अँड मशिन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, इंटरनेट ऑफ थिंग्स, डेटा इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग (डेटा सायन्स), कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग (आर्टीफिशिअल इंटेलिजेंस अँड मशिन लर्निंग), कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग (इंटरनेट ऑफ थिंग्स अँड सायबर सिक्युरिटी इन्क्ल्युडिंग ब्लॉकचेन टेक्नोलॉजी) अशा अभ्यासक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे.


शैक्षणिक वर्षाच्या वेळापत्रकाबाबत सुद्धा बैठकीत चर्चा करण्यात आली. एकीकडे महाविद्यालय बंद असताना ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांचे सुरु आहे. शिवाय, ऑनलाइन परीक्षा सुद्धा विद्यापीठाने यावर्षी व्यवस्थित पार पाडल्या. आता त्यानुसार विद्यार्थी, शिक्षक आणि इतर सर्व घटकांना लक्षात घेऊन त्याचबरोबर शैक्षणिक वर्षाची घडी सुरळीत बसविण्यासाठी शैक्षणिक सत्र निश्चित करण्यात आले आहे. यानुसार कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांसाठी 14 जून ते 30 ऑक्टोबर 2021 प्रथम सत्र, 15 नोव्हेंबर ते 1 मे 2022 दुसरे सत्र निश्चित करण्यात आले असून यामध्ये दिवाळी, नाताळ, आणि गणपती सणांच्या सुट्ट्यांचेही विशेष नियोजन करण्यात आले आहे. पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात 12 जून 2022 पासून होणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI