मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी परीक्षा (II) 2021 ची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. महत्त्वाचं म्हणजे, यूपीएससी एनडीए II परीक्षा 2021 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया चालू आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून आहे. उमेदवार केवळ अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर आपला परीक्षा अर्ज भरायचा आहे. परीक्षेचा अर्ज दाखल करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा अर्ज दाखल करावा लागणार आहे.
परीक्षेसाठी आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या सर्व नियम व अटीसह उमेदवार परीक्षेसाठी पात्र असणं आवश्यक असणं अत्यंत आवश्यक आहे.
6 जुलै 2012 ते 12 जुलै 2021 पर्यंत अर्ज मागे घेता येतील
ऑनलाईन अर्ज 6 जुलै 2021 ते 12 जुलै 2021 पर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घेता येऊ शकतात. दरम्यान, 5 सप्टेंबर 2021 रोजी यूपीएससीने एनडीएच्या सैन्य, नौदल आणि वायू दलाच्या विंग्समधील 148व्या कोर्समध्ये प्रवेश घेण्याची घोषणा केली असून 2 जुलै 2022 पासून सुरु होणाऱ्या 110व्या भारतीय नौदल अकादमी कोर्स (आयएनएसी) साठी परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
यूपीएससी NDA II परीक्षा 2021 संदर्भात माहिती :
टोटल पोस्ट : 400 पोस्ट
पोस्टचं नाव :
- नॅशनल डिफेंस अॅकॅडमी - एकूण 370 पद - 208 आर्मीसाठी, 42 नौदलासाठी आणि 120 पोस्ट एअर फोर्ससाठी
- नौदल अॅकॅडमी (10+2 कॅडेट एंट्री स्कीम) - 30
एलिजिबिलिटी क्रायटेरिया
वयोमर्यादा : केवल अविवाहित पुरुष उम्मेदवार ज्यांचा जन्म 02 जानेवारी, 2003 पूर्वी आणि 1 जानेवारी, 2006 नंतर झालेला नाही, अशा व्यक्ती परीक्षा अर्ज भरू शकतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Bank of India Recruitment : ऑफिस असिस्टंटसह इतर पदांसाठी भरती; जाणून घ्या वयोमर्यादा, पगार आणि पात्रता?
- वाढीव वेतनाची उचललेली रक्कम कुलसचिवांनी भरली, मात्र कारवाई होणार का? परभणीच्या कृषि विद्यापीठातील प्रकरण
- SSC ans HSC Students : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या करिअर मार्गदर्शनासाठी वेबिनार; शिक्षणमंत्र्यांची माहिती
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI