Nashik Latest News update : नाशिकमध्ये 'सनहॅक्स 2022 ' या तिन दिवसीय आंतरराष्ट्रीय हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आले असून यात देशभरासह सहा इतर देशांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. जवळपास दोन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून 36 तास एका समस्येवर या विद्यार्थ्यांनी काम केले आहे.
नाशिकच्या संदीप विद्यापीठात ESDS सॉफ्टवेअर सोल्यूशन कंपनीच्या पुढाकाराने संदीप युनिव्हर्सिटीत हॅकेथॉन भरवण्यात आली असून सलग 36 तासांची कम्प्युटर कोडिंगची स्पर्धा असून नाशिकच्या उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी ही स्पर्धा भरविण्यात आली आहे. नाशिकसह राज्यभरात बहुचर्चित असणारी संदीप युनिव्हर्सिटी मध्ये हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये परीक्षकांनी दिलेल्या समस्या सोडवण्यासोबतच वेब डिझाईन/ मोबाईल ऍप डेव्हलोपिंग, फिन टेक, हेल्थ टेक आणि मशीन लर्निंग या चार थीम स्पर्धकांना देण्यात आल्या आहेत. यामध्ये परीक्षकांनी दिलेल्या समस्येवर विद्यार्थ्यांना काम करणे आवश्यक होते. त्यानुसार 36 तासांत या समस्यांवर योग्य ते उपाय अँपच्या माध्यमातून मागविण्यात आले होते.
त्यानुसार अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होत विविध उपाययोजना घेऊन आपले प्रकल्प सादर केले आहेत. विशेष म्हणजे यातील विजयी स्पर्धकांना ESDS सॉफ्टवेअर सोल्यूशनकडून एक लाख रुपये रोख मिळण्यासोबतच त्यांना आयटी कंपन्यांमध्ये नोकरीची देखील संधी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा केवळ स्पर्धकांची विचारक्षमता, सर्जनशीलता, नैतिक मूल्य, वेळेचे नियोजन आदी गुणांची पारख करणारी असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्टार्टअप साठी प्लॅटफॉर्म मिल या हेतून हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या हॅकेथॉनमध्ये जवळपास 2 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तर 1 हजार विद्यार्थ्यांचा निवड हॅकेथॉनसाठी करण्यात आली.
कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग संदीप विद्यापीठ आणि ESDS सॉफ्टवेअर सोल्युशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील तीन दिवशीय 'सनहॅक्स २०२२' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत जवळपास 411 संघ सहभागी झाले असून यातील 2 हजार स्पर्धकांनी सहभागी नोंदविला आहे.
परदेशातून सहभागSUNHACKS-2022 मध्ये भारतातील 26 राज्यातील 250 संघ सहभागी झाले होते, तर 1200 स्पर्धक सहभागी होते. पंजाब, हरियाणा, दिल्ली, मध्यप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, ओडिशा, कर्नाटक येथील विद्यार्थी सहभागी आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील युगांडा, नायजेरिया, झिम्बाब्वे, पश्चिम आफ्रिकेतील विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
विद्यार्थ्यांना स्टार्टअप साठी मदत देणारदरम्यान या हॅकेथॉनच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना याद्वारे स्टार्टअप सुरू करावयाचा असेल तर अनुदान देखील देण्यात येणार आहे. यातील सहभागी स्पर्धकांना देण्यात आलेल्या समस्येवर उपाय शोधून तो कसा वापरू शकतो, हे सांगणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थी अगदी सर्व शक्यता वापरून काम करत आहेत. शिवाय या स्पर्धेनंतर ज्या विद्यार्थ्यांना यातून पुढे स्टार्टअप करावयाचे असल्यास अनुदान देण्यात असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI