Asian Boxing Championships: जॉर्डनच्या (Jordan) अम्मान (Amman) येथे सुरू असलेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारतीय बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेननं (Lovlina Borgohain) 75 किलो वजनी गटात, परवीन हुडा (Parveen Hooda) 63 किलो वजनी गटात, सवेटीनं (Saweety) 81 किलो वजनी गटात आणि अल्फिया पठाणनं (Alfiya Pathan) 81+ किलोवजनी गटात सुवर्णपदक जिंकलं. परवीननं जपानच्या किटो माईवर एकतर्फी विजय मिळवला. तिनं 63 किलो वजनी गटात किटो माईला 5-0 असा विजय मिळवला.
ट्वीट-
ट्वीट-
ट्वीट-
जगातील दुसऱ्या क्रमांकाची आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा
आशियाई स्पर्धा अथवा एशियाड ही दर चार वर्षांनी आशियामधील देशांदरम्यान भरवली जाणारी एक बहु-क्रीडा स्पर्धा आहे. ह्या स्पर्धेचं आयोजन आशिया ऑलिंपिक समिती ही आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची एक पाल्य संस्था करते. ऑलिंपिक खेळांखालोखाल एशियाई स्पर्धा ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे.
महिलांची जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा पुढील वर्षी भारतात
भारतात पुढच्या वर्षी महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे. ही स्पर्धा नवी दिल्ली (Delhi) येथे जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर (Jawaharlal Nehru Stadium) होण्याची शक्यता आहे.भारतात तिसऱ्यांदा महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. यापूर्वी 2006 आणि 2018 मध्ये नवी दिल्ली येथे महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपचं आयोजन केलं करण्यात आलं होतं. दोन वर्षापूर्वी जागतिक नियामक मंडळाला आवश्यक शुल्क न दिल्यानं पुरुषांच्या स्पर्धेचे यजमान हक्क काढून घेतलं होतं. भारतात पुरुषांची जागतिक अजिंक्यपद स्पर्धा कधीच आयोजित करण्यात आलं होतं.
हे देखील वाचा-