एक्स्प्लोर

MPSC Online Exam Postponed: मोठी बातमी! एमपीएससी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू होणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश, विद्यार्थी संघटनांच्या मागणीला यश

MPSC Online Exam Postponed: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC Online Exam) संगणकआधारित (CBT) परीक्षा पद्धतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे.

MPSC Online Exam Postponed : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC Online Exam) संगणकआधारित (CBT) परीक्षा पद्धतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. विद्यार्थी संघटनांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर मुख्यमंत्री यांनी MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार, राज्याचे मुख्य सचिव आणि सामान्य प्रशासन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री (Devendra Fadnavisम्हणाले की, भरती प्रक्रिया सुरक्षित, पारदर्शक आणि वेळेत होणे आवश्यक आहे. मात्र, नवीन परीक्षा पद्धती लागू करताना विद्यार्थी आणि यंत्रणांना पुरेसा वेळ मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यामुळे संगणकआधारित (CBT) परीक्षा पद्धती तातडीने लागू न करता ऑगस्ट 2027 पासून टप्प्याटप्प्याने अंमलात आणावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तोपर्यंत MPSC च्या परीक्षा सध्याच्या प्रचलित पद्धतीनेच घेतल्या जाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या संदर्भातील अंतिम निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेणार असून, बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आयोगाच्या विविध सुधारणा उपक्रमांचेही कौतुक केले.

Devendra Fadnavis : संगणक आधारित परीक्षा प्रणाली ऑगस्ट 2027 पासून टप्प्याटप्प्याने लागू करा

एमपीएससीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घ्या, अशी मागणी एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली होती. परिणामी आंदोलनाचा देखील इशारा दिला होता. अशातच विद्यार्थी शिष्टमंडळाने नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांच्या मध्यस्थीने हि भेट घेण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यांनतर एमपीएससी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू होणार नाही. संगणक आधारित परीक्षा प्रणाली ऑगस्ट 2027 पासून लागू करा, असे निर्देश प्रशासन आणि विद्यार्थी संघटनांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

Abhimanyu Pawar : 90 टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची इच्छा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो

तर या विषयी बोलताना आमदार अभिमन्यू पवार म्हणाले कि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो की त्यांनी विद्यार्थी संघटनांची भावना लक्षात घेतली. 90 टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची इच्छा होती की परीक्षा ऑफलाईन घेतली पाहिजे. विद्यार्थी यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे, त्यांनी आता अभ्यास करावा. मुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक झाली, त्यात त्यांनी स्पष्ट केलं की ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी यंत्रणा उभी करू. टप्प्याटप्प्याने परीक्षा आपल्याला देखील ऑनलाईन घ्याव्या लागतील, असेही ते म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget