Maharashtra SSC 10th Result 2024 Live: दहावीचा निकाल जाहीर, मुलींनी मारली बाजी, कोकण विभाग आघाडीवर

Maharashtra SSC Result 2024 Live Updates : MSBSHSE म्हणजेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल https://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर जाहीर केला जाईल.

युवराज जाधव Last Updated: 27 May 2024 01:06 PM
Maharashtra SSC 10th Result 2024 Live: दहावीचा निकाल वेबसाईटवर जाहीर, ऑनलाईन निकाल उपलब्ध 

दहावीचा निकाल वेबसाईटवर जाहीर, ऑनलाईन निकाल उपलब्ध 





Maharashtra SSC 10th Result 2024 Live: दहावीचा निकाल जिथं पाहणार त्या वेबसाईटची यादी  

दहावीचा निकाल जिथं पाहणार त्या वेबसाईटची यादी  


Maharashtra SSC 10th Result 2024 Live : दहावीचा निकाल कसा पाहणार?

स्टेप 1 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या mahresult.nic.in या वेबसाईटला भेट द्या. 


स्टेप 2 : होमपेजवरील दहावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. 


स्टेप 3 : तुमच्या लॉगीन डिटेल्स, परीक्षा क्रमांक, आईचं नोंदवा.


स्टेप 4 : स्क्रीनवर तुमचा निकाल उपलब्ध होईपर्यंत थांबा. 


स्टेप 5 : निकाल उपलब्ध झाल्यानंतर तो पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करा किंवा त्याची प्रिंट आऊट घ्या. 

Maharashtra SSC 10th Result 2024 Live : विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल https://mahresult.nic.in/ वेबसाईटवर पाहता येणार

 Maharashtra SSC 10th Result 2024 Live : विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल  https://mahresult.nic.in/ वेबसाईटवर पाहता येणार आहे. 

SSC Result 2024 :दहावीच्या निकालात 38 शाळांना भोपळा, शभंर टक्के निकाल किती शाळांचा लागला?
Maharashtra SSC 10th Result : दहावीच्या परीक्षेत अतिरिक्त गुणांचा लाभ घेत 187 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण

187 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण, अतिरिक्त गुण घेऊन त्यांना 100 टक्के गुण मिळालेले आहेत. ( प्रश्न पत्रिका सोडवून एकाला ही 100 टक्के गुण मिळालेले नाहीत.)

Maharashtra SSC 10th Result : शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या

शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या  : 9382


पुणे :1542


नागपूर: 1007


छत्रपती संभाजीनगर :840


मुंबई :1533


कोल्हापूर :1270


अमरावती: 1063


नाशिक विभाग :1006


लातूर  :608


कोकण :513


23288 शाळांची नोंदणी  


शंभर टक्के शाळा : 40.29  टक्के 


शुन्य टक्के निकाल शाळा :0.16


 

Maharashtra SSC 10th Result : शुन्य टक्के निकाल लागलेल्या शाळा :38

शुन्य टक्के निकाल लागलेल्या शाळा :38


पुणे :6


नागपूर: 5


छत्रपती संभाजीनगर :5


मुंबई :5


कोल्हापूर :1


अमरावती: 7


नाशिक विभाग :3


लातूर  :6


 


 


 

Maharashtra SSC Result Live Update : दहावीचा निकाल जाहीर, राज्यातील 95.81 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.


दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना या वर्षीपासून उत्तर पत्रिकेची फोटोकॉपी दिली जाणार आहे. 


दहावीच्या यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचं बोर्डाच्यावतीनं शरद गोसावी यांनी अभिनंदन केलं.  


 

MSBSHSE SSC Result 2024 : दहावीच्या निकालाची टक्केवारी बेस्ट ऑफ फाईव्ह प्रमाणं

दहावीची परीक्षा सहा विषयांसाठी घेण्यात येते. त्यापैकी बेस्ट ऑफ फाईव्ह पद्धतीनं टक्केवारी जाहीर करण्यात येते. 

Maharashtra SSC 10th Result Press Live : दहावीच्या परीक्षेत मुलींची बाजी, कोकण विभाग आघाडीवर

Maharashtra SSC 10th Result Press Live  :  राज्यातील नियमित, पुनर्परीक्षार्थी आणि खासगी विद्यार्थी  16 लाख 11 हजार 818 विद्यार्थी नोंदणी 



  • 16 लाख 21 विद्यार्थी परीक्षेला बसले

  • 15 लाख 17  हजार 802 विद्यार्थी उत्तीर्ण

  • 94.86 टक्के निकाल

  • 9149 दिव्यांग विद्यार्थी, 9078 परीक्षेला बसले, 

  • 8465 विद्यार्थी उत्तीर्ण

  • दिव्यांग विद्यार्थी निकाल 93.25 टक्के

  • कोकण विभागीय मंडळाचा निकाल सर्वोत्तम : 99.00 टक्के निकाल

  • सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 94 टक्के 

  • मुलींची उत्तीर्ण टक्केवारी 97.21 टक्के

  • मुलांची टक्केवारी : 94.56 टक्के 

  • यंदाही दहावीच्या निकालात मुलींची बाजी 

  • 72 पैकी 18 विषयांचा निकाल 100 टक्के लागला 

Maharashtra SSC 10th Result Press Live : दहावीच्या निकालाबाबत बोर्डाची पत्रकार परिषद सुरु

Maharashtra SSC 10th Result Press Live  :  



  • पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागातून 15 लाख 60 हजार 154 नियमित विद्यार्थ्यांची नोंदणी, 15 लाख 49 हजार विद्यार्थी परीक्षेला बसले. 

  • 14 लाख 84 हजार 441 विद्यार्थी उत्तीर्ण

  • दहावीचा निकाल 95.81

  • 25770 रिपीटर विद्यार्थ्यांची नोंदणी 25327 परीक्षेला बसले, 12958 विद्यार्थी उत्तीर्ण झाले

  • रिपीटरचा निकाल 51 टक्के


 

Maharashtra SSC 10th Result Press Live : दहावीच्या निकालाबाबत बोर्डाची पत्रकार परिषद सुरु

Maharashtra SSC 10th Result Press Live  :  दहावीच्या निकालाबाबत बोर्डाची पत्रकार परिषद सुरु 



  • परीक्षेच्या काळात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी भरारीपथकाची नियुक्ती 

  • दरवर्षीप्रमाणं परीक्षेच्या नियमित कालावधीनंतर दहा मिनिटे वाढवून देण्यात आली होती.

  • परीक्षेत गैरप्रकार केल्यास कोणती कारवाई होऊ शकते याबाबत माहिती देण्यासाठी शिक्षा सूचीचे वाचन करण्यात आलेलं

  •  

Maharashtra SSC 10th Result Press Live : दहावीच्या निकासासंदर्भातील बोर्डाची पत्रकार परिषद सुरु

Maharashtra SSC 10th Result Press Live  :  परीक्षेत यशस्वी न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांनी जुलैमधील पुरवणी परीक्षेला बसावं असं आवाहन शरद गोसावी यांनी केलं. 


परीक्षेचं वेळापत्रक 2 नोव्हेंबर 2023 ला  जाहीर केलं होतं.


परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी नकारात्मकतेनं ग्रासलेले असतात, त्यामुळं समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली होती.


दहावीची परीक्षा 72 विषयांसाठी घेण्यात आली होती. आठ माध्यमांमध्ये परीक्षा घेण्यात आली होती.

Maharashtra MSBSHSE Press Conference : दहावीच्या निकालासंदर्भात बोर्डाची पत्रकार परिषद 11 वाजता सुरु होणार

Maharashtra MSBSHSE Press Conference : दहावीच्या निकालासंदर्भात बोर्डाची पत्रकार परिषद 11 वाजता सुरु होणार आहे. यामध्ये निकालाबाबत ठळक माहिती दिली जाईल. 

Maharashtra SSC 10th Result Live : दहावीच्या निकालासंदर्भात थोड्याच वेळात बोर्डाची पत्रकार परिषद

Maharashtra SSC 10th Result Live : दहावीच्या निकालासंदर्भात थोड्याच वेळात बोर्डाकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून पत्रकार परिषदेत निकालाचा गोषवारा मांडला जाईल.  

SSC Result Depak Kesarkar : दीपक केसरकरांच्या माहितीप्रमाणं निकाल 27 मे म्हणजे आजच जाहीर होणार

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दहावीचा निकाल 27 मे पर्यंत जाहीर होणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार दहावीचा निकाल आज जाहीर होत आहे. 

SSC Result Update : दहावीचा निकाल पाहताना वेबसाईट क्रॅश झाल्यास निकाल कसा पाहाल?

दहावीचा निकाल पाहण्यासाठी 16 लाख विद्यार्थी उत्सुक असतील, अशावेळी वेबसाईट क्रॅश झाल्यास विद्यार्थी डिजीलॉकरद्वारे निकाल पाहू शकतात. 

Maharashtra SSC 10 th Result 2024 Live in Marathi : दहावीच्या निकालाला चार तास बाकी, 16 लाख विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

दहावीचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीनं प्रसिद्ध  केला जाणार आहे. या निकालाची प्रतीक्षा 16 लाख 9 हजार 544 विद्यार्थी करत आहेत. 

SSC Board Exam : आज दहावीचा निकाल, त्यापूर्वी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद

SSC Board Exam : आज महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. निकाल जाहीर करण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीनं पत्रकार परिषद घेतली जाईल. पत्रकार परिषदेतून निकालासंदर्भातील ठळक माहिती दिली जाईल. शैक्षणिक वर्ष 2023 -2024 मध्ये दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी 16 लाख 9 हजार 544 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांसह पालकांचीही निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

SSC Board Exam : आज दहावीचा निकाल, त्यापूर्वी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद

SSC Board Exam : आज महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. निकाल जाहीर करण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीनं पत्रकार परिषद घेतली जाईल. पत्रकार परिषदेतून निकालासंदर्भातील ठळक माहिती दिली जाईल. शैक्षणिक वर्ष 2023 -2024 मध्ये दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी 16 लाख 9 हजार 544 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांसह पालकांचीही निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

Maharashtra SSC Result 2024 : दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या अधिकृत वेबसाईटची यादी एका क्लिकवर
Maharashtra SSC 10th Result 2024 Live : दहावीचा निकाल पाहण्याचा दुसरा पर्याय कोणता?

दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डानं जारी केलेल्या अधिकृत वेबसाईटसह डिजीलॉकरवरुन देखील निकाल पाहता येईल. त्यासाठी ते अॅप तुमच्या फोनमध्ये असणं आवश्यक आहे. 

SSC Result 2024 Live : दहावीचा निकाल पाहण्यासाठी महत्त्वाची वेबसाईट कोणती?

राज्यातील दहावीचे 16 लाख विद्यार्थी त्यांचा निकाल https//mahresult.nic.in या वेबसाईटवर पाहू शकतात. 

Maharashtra Board SSC 10th Result 2024 : बेस्ट ऑफ लक! आज दहावीचा निकाल, दुपारी 1 वाजता जाहीर होणार, कुठे पाहाल?
Maharashtra SSC Result 2024 Today : दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालाच्या शुभेच्छा, निकाल कुठं पाहणार?

दहावीचा निकाल ज्या वेबसाईटवर जाहीर होणार, त्याची यादी :



 https://mahresult.nic.in


http://sscresult.mkcl.org  


https://sscresult.mahahsscboard.in


https://results.digilocker.gov.in


https://results.targetpublications.org


Maharashtra SSC Result Live Update : दहावीच्या परीक्षेसाठी मुंबईतून किती विद्यार्थ्यांनी नोंदणी केली?

महाराष्ट्रातून दहावीच्या परीक्षेसाठी 16 लाख 9 हजार 544 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी मुंबई विभागातून 3 लाख 60 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

Maharashtra SSC Result 2024 Live : दहावीच्या निकालाचं काऊंटडाऊन सुरु, निकाल घोषित होण्यास उरले काही तास

Maharashtra SSC Result 2024 Live : दहावीच्या निकालाचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. दहावीचा  निकाल घोषित होण्यास काही तास उरले आहेत.

Maharashtra SSC Board Result Live : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, अकरावी बारावीला इंग्रजी विषयाची सक्ती शिथील

महाराष्ट्र राज्यात आगामी शैक्षणिक वर्षापासून इंग्रजी भाषेला आवश्यक विषयाच्या यादीतून वगळण्यात आलं आहे. इंग्रजी भाषा आता विदेशी भाषेच्या यादीत असेल. 

Maharashtra SSC Result 2024 : दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहता येणार? अधिकृत वेबसाईटची यादी एका क्लिकवर
Maharashtra Examination Results 2024 : दहावीचा निकाल कसा पाहणार?

राज्यातील 16 लाख विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध होणार आहे. हा निकाल बोर्डाच्या वेबसाईटवर पाहता येईल.


स्टेप 1 : बोर्डानं दिलेल्या वेबसाईटला म्हणजेच https://mahresult.nic.in  ला भेट द्या


स्टेप 2 : दहावी परीक्षा निकाल पर्यायावर क्लिक करा 


स्टेप 3 : तुमचा परीक्षा क्रमांक नोंदवा


स्टेप 4 : यानंतर तुमच्या आईचं नाव आणि इतर आवश्यक माहिती भरा 


स्टेप 5 : निकाल तुम्हाला मोबाईल किंवा कम्प्युटर स्क्रिनवर पाहायला मिळेल.

SSC Result Live : दहावीच्या निकालात कोणता विभाग बाजी मारणार?

 बारावीचा निकाल जाहीर झाला त्यामध्ये कोकण विभागानं  बाजी मारली होती. दहावीच्या निकालात कोणता विभाग बाजी मारणार याकडे  लक्ष लागलंय.

Maharashtra SSC Result 2024 : दहावीच्या निकालाच्या वेबसाईटची यादी जाणून घ्या

दहावीचा निकाल ज्या वेबसाईटवर जाहीर होणार, त्याची यादी :


 https://mahresult.nic.in


http://sscresult.mkcl.org  


https://sscresult.mahahsscboard.in


https://results.digilocker.gov.in


https://results.targetpublications.org

Maharashtra SSC Result 2024: दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालपत्राची छापील प्रत कुठे मिळणार?

दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रत त्यांच्या शाळेमध्ये उपलब्ध होईल. ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांनी निकालाची छापील प्रत मिळते.

Maharashtra SSC Result Live Update 2024 : 16 लाख विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

दहावीच्या परीक्षेला 16 लाख 9 हजार 544  विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या विद्यार्थ्यांची निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

Maharashtra SSC Result 2024 Live : दीपक केसरकरांची माहिती खरी ठरली, 27 मेला निकाल जाहीर होणार

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दहावीचा निकाल 27 मे पर्यंत जाहीर होणार असल्याची माहिती दिली होती.  ती खरी ठरली असून उद्या दहावीचा निकाल जाहीर होत आहे. 

SSC Result 2024 : दहावीच्या निकालात यंदा कोण बाजी मारणार?

दहावीच्या निकालात दरवर्षी मुली बाजी मारत असल्याचं पाहायला मिळतं. यावर्षी तिच परंपरा कायम राहणार का हे उद्या जाहीर होणाऱ्या निकालामध्ये स्पष्ट होईल. 

SSC Result 2024 : दहावीच्या निकालापूर्वीच अकरावीची प्रवेश नोंदणी प्रक्रिया सुरु

दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अकरावीची प्रवेश नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आलं आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नोंदणीचा दुसरा टप्पा सुरु होईल. 

Maharashtra SSC Result 2024 Live : दहावीच्या परीक्षेत अपयश आल्यास पुन्हा परीक्षेसाठी अर्ज कधी करणार?

जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार दिनांक ३१/०५/२०२४ पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत

SSC Result On Digi Locker : दहावीच्या विद्यार्थ्यांना डिजी लॉकरवर देखील निकाल पाहता येणार

SSC Result On Digi Locker : दहावीच्या विद्यार्थ्यांना डिजी लॉकरवर देखील निकाल पाहता येणार आहे. दहावीचे विद्यार्थी मोबाईल फोनमध्ये डिजीलॉकर अॅप डाऊनलोड करुन दहावीचा निकाल पाहू शकतात.  

Maharashtra Examination Results 2024 : श्रेणी सुधार योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते पर्याय?

 Maharashtra Examination Results 2024 : मार्च २०२४ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी (जुलै-ऑगस्ट २०२४ व मार्च २०२५) श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.

MBSSC 2024 : दहावीचा एकत्रित निकाल शाळांना कुठं मिळणार?

दहावीचा निकाल 27 मेला दुपारी एक वाजता जाहीर झाल्यानंतर https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल. 

SSC Examination Result March 2024 : दहावीच्या 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची प्रतीक्षा शिगेला

SSC Examination Result March 2024 :दहावीच्या 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची प्रतीक्षा शिगेला  पोहोचली आहे. निकाल कधी जाहीर होणार याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. 

Maharashtra SSC Result 2024 Live : दहावीचा निकाल कुठे जाहीर केला जाणार?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर  म्हणजेच mahresult nic in वर जाहीर करण्यात येईल. 

Maharashtra SSC Result 2024 Live : दहावीचा निकाल काही तासांवर, लाखो विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Maharashtra SSC Result 2024 Live : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल 27 मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार आहे. 

पार्श्वभूमी


Maharashtra SSC Result 2024 Live, Maharashtra Examination Results 2024 Mahresult nic in : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल 27 मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येईल. यापूर्वी मंडळाकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये निकालाबाबतची ठळक माहिती सादर केली जाईल. दहावीचा निकाल https://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर जाहीर केला जाणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.