मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) 2024 मधील परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान हे वेळापत्रक संभाव्य असल्यामुळे परीक्षेच्या तारखांमध्ये बदल देखील होऊ शकतो. पण जर काही असा बदल झाला तर त्याबाबत आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्याबाबत माहिती देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था आदींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन निश्चित करण्यात येते.त्यानुसार सर्व संबंधित संस्थांना प्रस्तावित वेळापत्रक पाठवून दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Continues below advertisement


संभाव्य वेळापत्रकाबाबतची सद्यस्थिती  दर्शविणारी अपडेटेड माहिती वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच संबंधित परीक्षेची परीक्षायोजना, अभ्यासक्रम, निवड पद्धत इत्यादी तपशील देखील आयोगाच्या संकेस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये परीक्षेबाबतची संपूर्ण माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली नसेल त्याबाबत कार्यवाही देखील करण्यात येणार असल्याचं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. या परीक्षेच्या माध्यमातून किती पदसंख्येची भरती करण्यात येणार आहे, याबाबत देखील माहिती देण्यात येणार आहे. 


परीक्षांच्या संभाव्य तारखा


स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांना अभ्यास योग्य पद्धतीने करता यावा यासाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर केले जाते. या संभाव्य वेळापत्रकानुसार  महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही 28 एप्रिल रोजी होणार आहे. दरम्यान राज्यसेवा मुख्य परीक्षा या परीक्षा या 14 ते 16 डिसेंबर या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे. 


महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा अशा परीक्षांमध्ये काही बदल झाल्यास ते वेळोवेळी संकेतस्थावर उपलब्ध करुन देण्यात येतील.  संभाव्य वेळापत्रकात परीक्षेचे स्वरुप, जाहिरात प्रसिद्ध होण्याचा महिना कोणता असेल याबाबत तपशील देण्यात आलाय. तसेच विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला म्हणजेच  http://www.mpsc.gov.in भेट द्यावी, असं आयोगाकडू सागंण्यात आलं आहे. 


हेही वाचा : 


शाळेतील विद्यार्थ्यांना आता महाभारत आणि रामायणाचे पाठ मिळणार, देशभक्ती आणि स्वाभिमान वाढवण्यासाठी NCERT पॅनेलची शिफारस


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI