मुंबई :  विद्यापीठ परीक्षांमध्ये असलेली क्रेडिट (National Credit System)  पद्धती लवकरच शालेय शिक्षणातदेखील  पाहायला मिळणार आहे. आता पदवी अभ्यासक्रमाप्रमाणे पहिलीच्या वर्गापासून लागू  क्रेडिट सिस्टम  पॅटर्न आता शालेय स्तरावर राबवला जाणार आहे. शालेय, महाविद्यालयीन आणि उच्च महाविद्यालयीन शिक्षण एकच पद्धत अलवलंबली जावी यासाठी आता श्रेयांक पद्धती अवलंबली जाणार आहे. इयत्ता पाचवी ते पीएचडीपर्यंतच्या सर्व वर्गांच्या मूल्यमापनासाठी श्रेयांक पद्धत (क्रेडिट सिस्टम)लागू केली जाणार आहे.


इयत्ता पहिलीपासून ते पदवीच्या शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांना एका वर्षात 800 ते 1200 शैक्षणिक तास पूर्ण करावे लागतील. या 1200 शैक्षणिक तासांसाठी 40 क्रेडिट्स दिले जातील. 800 तासांसाठी 27 क्रेडिट आणि 1000 शैक्षणिक तासांसाठी 33 क्रेडिट्स दिले जातील. विद्यार्थ्यांना मिळालेल्या क्रेडिट्सनुसार रँक दिले जाणार आहेत. पहिलीच्या वर्गापासून ते पीएचडी पर्यंत शिक्षणाची आठ स्तरांमध्ये विभागणी केली आहे, शालेय स्तरावर चार आणि उच्च शिक्षण स्तरावर चार अशा प्रकारची करण्यात आली आहे.


 उच्च शिक्षणामध्ये, सर्व पदवीपूर्व पदवी, पदव्युत्तर पदवी, त्यानंतर पीएचडीनंतरचे शिक्षण तसेच शालेय शिक्षणात व्यावसायिक शिक्षण व पहिले ते आठवीचे शिक्षणाचा व माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गाचा समावेश केला आहे. आतापर्यंत केवळ काही राष्ट्रीय संस्था तसेच ओपन स्कुलिंगची सुविधा देण्याऱ्या संस्थांकडून श्रेयांक पद्धतीचा वापर केला जात असे. आता कौशल्य आधारित तसेच व्यावसायाभिमूख शिक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे.


 नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कचा मसुदा मंगळवारी सार्वजनिक केला आहे. हा मसुदा 11 सदस्यांच्या समितीने तयार केला आहे. विद्यापीठ स्तरावर असलेली ही श्रेयांक पद्धत  शालेय शिक्षणातही लागू केली जाणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोग, ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन आणि नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन यांच्या सदस्यांचा समावेश असलेल्या उच्चस्तरीय समितीने संयुक्तपणे शालेय शिक्षण, उच्च शिक्षण आणि कौशल्यासाठी हा आराखडा तयार केला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने जारी केलेल्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी मिळवलेले क्रेडिट हे सात वर्षांपर्यंत ग्राह्य धरण्यात येणार आहेत.


 श्रेयांक पद्धतीत विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम, विषय निवडण्याची मुभा असते. तसेच ते शिक्षण सुरु असतानाच विद्यार्थी अभ्यासक्रम किंवा शैक्षणिक संस्थादेखील बदलू शकतात.  असे करताना विद्यार्थ्यांच्या श्रेयांकामध्ये कोणताही परिणाम होणार नाही. यामुळे शिक्षणात लवचकिता असल्याने ही पद्धत फायदेशीर असल्याचे म्हटले आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेले क्रेडिट्स हे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट मध्ये ठेवण्याची त्यांना परवानगी असेल.


श्रेयांक पद्धत म्हणजे काय ?



  • विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यासाठी श्रेयांक पद्धतीचा उपयोग केला जातो. यापूर्वी काही विद्यापीठांकडून पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धतीची (सीबीसीएस- चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम) अंमलबजावणी केली आहे. विद्यापीठांत पदवी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन श्रेयांक पद्धतीनुसार होते. 

  • या पद्धतीत विद्यार्थ्यांना वेगवेगळे अभ्यासक्रम निवडण्याची सवलत दिलेली असते. आता नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कच्या माध्यमातून शालेय शिक्षण घेताना विद्यार्थ्यांचे मूल्यांकन श्रेयांकन पद्धतीने केला जाणार आाहे.

  • कला क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना श्रेयांक देण्याची मुभा देण्यात आली आहे

  •  तसेच भारतीय ज्ञान परंपरेतील 18 विद्या आणि 64 कलांमध्ये समावेश असलेल्या अन्य घटकांना आता श्रेयांक देता येतील अठरा विद्यामध्ये चार वेदांसह, आयुर्वेद, धनुर्वेद शिल्प, न्याय ,धर्मशास्त्र, खगोलशास्त्र यांचा समावेश आहे


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI