Education News : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बोगस शाळांचा (Bogus School) मुद्दा गाजत असतानाच प्ले स्कूल, प्री प्रायमरी, केजी, नर्सरी शाळा याबाबत शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरच नव्हे तर गावागावात भरणाऱ्या प्ले स्कूल, प्री प्रायमरी, केजी, नर्सरी शाळा यांच्यावर आतापर्यंत कुणाचेही नियंत्रण नव्हते. परंतु आता अशा शाळांची मनमानी संपणार आहे. कारण यापुढे अशा शाळा सुरु करताना नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण विभागाची परवानगी आवश्यक असणार आहे. तसेच या शाळांवर शिक्षण विभागाचे नियंत्रण असणार आहे. शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांची बैठक झाली असून, त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. 


गेल्या काही वर्षात प्ले स्कूल, प्री प्रायमरी, केजी, नर्सरी शाळांचे प्रमाण वाढले आहे. एवढंच नाही तर वाटेल तो गल्लीबोळात अशा शाळा सुरु करत असल्याचे चित्र पाहायला मिळते. विशेष म्हणजे अशा शाळांवर आतापर्यंत शिक्षण विभागाचे कोणतेही नियंत्रण नसल्याने, मनमर्जी कारभार पाहायला मिळायचा. शाळांच्या नावाखाली अवाजवी शुल्क घेणे, मनमानी पद्धतीने शाळा चालवणे, शुल्क निर्धारित न ठेवणे या सर्व बाबींवर कोणाचेही नियंत्रण नव्हते. अशात शिक्षण विभागाने अंगणवाड्या प्राथमिक शाळांना जोडण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच यापुढे प्ले ग्रुप, नर्सरी, बालवर्ग, केजी आदी वर्ग सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाची परवानी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 


खासगी पद्धतीने नर्सरी, केजी, प्ले गृप असे वर्ग घेवून शाळा चालवण्याचे प्रमाण वाढले आहे. पण यापुढे अशा शाळांवर शिक्षण विभागाचे लक्ष असणार आहे. एवढंच नाही तर अशा शाळा सुरु करण्यापूर्वी शिक्षण विभागाची परवानगी घेणं देखील बंधनकारक असणार आहे. मुलांना वयानुसार, मानसिक विकासासानुसार शिक्षण देणे अनिवार्य असणार असल्याचे नवीन शैक्षणिक धोरणानुसार निर्णय घेण्यात आला आहे. या सोबतच शाळांमध्ये विद्यार्थी मूल्यमापन देखील होणार असल्याची माहिती शिक्षण अधिकारी यांच्याकडून देण्यात आली आहे. 


पालकांना दिलासा मिळणार... 


दरम्यान खासगी पद्धतीने नर्सरी, केजी, प्ले गृप असे वर्ग घेवून शाळा चालवण्याचे प्रमाण वाढले आहेत. तर अंगणवाड्या असताना देखील आपल्या मुलांना नर्सरी केजीसह इतर वर्गात पाठवण्याचं क्रेज पालकांमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र याचाच गैरफायदा घेत अनेक संस्थाचालकांकडून वाजवी शुल्क घेणे, मनमानी पद्धतीने शाळा चालवणे, शुल्क निर्धारित न ठेवणे असे प्रकार करण्यात येत असल्याचे प्रकार समोर येत होते. मात्र आता याला चाप बसणार असून, यापुढे अशा शाळांवर शिक्षण विभागाचे नियंत्रण असणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Education News: राज्यात आठशेहून अधिक शाळा अनधिकृतपणे सुरू; आता थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI