Education News: राज्यातील अनधिकृतपणे सुरू असलेल्या बोगस शाळांचा (Bogus School) मुद्द गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तर राज्यात जवळपास आठशेहून अधिक शाळा अनधिकृतपणे सुरू असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आता या अनधिकृतपणे शाळांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बोगस शाळांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यासाठी शिक्षण विभागाने आदेश जारी केले आहे. त्यामुळे आता बृहन्मुंबई, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील सर्वच जिल्ह्यातील बोगस शाळांवर गुन्हे दाखल होणार आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 


केंद्रीय मंडळाच्या नावाने राज्यभरातील वेगवगेळ्या जिल्ह्यात आठशेहून अधिक शाळा अनधिकृतपणे सुरू आहे. त्यामुळे याची गंभीर दखल शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी घेतली आहे. तसेच अशा अनधिकृतपणे सुरु असलेल्या शाळांवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. सोबतच राज्य मंडळाव्यतिरिक्त इतर मंडळाच्या शाळांच्या वैधता प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे आदेश देखील शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. त्यातच आता अनधिकृत शाळा बंद करण्यासाठी  त्यांच्यावर संबंधित पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यासाठी आदेश जारी करण्यात आले आहे. 


शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशातील सूचना...



  • वैध कागदपत्रे नसणाऱ्या शाळांवर प्रचलित आदेश, शासन निर्णय, परिपत्रक तसेच संचलनालय स्तरावरून वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे शाळा बंद करण्यात येणार.

  • आवश्यकतेप्रमाणे संबंधित शाळांवर एफआयआर दाखल करण्यात येणार आहे.

  • तसेच अशा अनधिकृत शाळांवर 7/12 वर बोजा चढवण्याची कारवाई केली जाणार.

  • विद्यार्थ्यांचे अन्य इतर शाळांमध्ये समायोजन करणे इत्यादी कार्यवाही करणे आवश्यक असणार आहे़.

  • राज्यातील काही शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षकांकडून शिक्षण विभागाकडे अहवाल सादर करण्यात आला नाही़. त्यामुळे या संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक पुर्तता अहवाल तत्काळ स्वतंत्र हस्तबटवड्याद्वारे शिक्षण विभागास सादर करावे.

  • संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक पुर्तता अहवाल तत्काळ सादर न केल्यास टास्क फोर्सकडून दाखल होणाऱ्या फौजदारी गुन्ह्यामध्ये शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षकांना सहआरोपी करण्यात येणार. 


शिक्षण क्षेत्रात खळबळ... 


गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील वेगवगेळ्या जिल्ह्यात अनधिकृतपणे शाळा चालवल्या जात आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत सुरु असलेला खेळ थांबवण्यासाठी आता शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. त्यानुसार आता अशा बोगस शाळांविरोधात थेट कारवाई आणि गरज पडल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश शिक्षण विभागाने काढले आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तर बोगस शाळा चालवणाऱ्या संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे आता किती शाळांवर कारवाई होते आणि गुन्हे दाखल केले जातात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


CBSE Exam Result 2023 : दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार; या ठिकाणी पाहा निकाल


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI