मुंबई : राज्याचा बारावी परीक्षेचा निकाल (Maharashtra HSC Results 2020 Declared) अखेर जाहीर झाला आहे. राज्याचा बारावीचा निकाल 90.66 टक्के लागला आहे, जो गेल्यावर्षीच्या तुलनेत 4.78 टक्क्यांनी वाढला आहे. मागील वर्षी हा निकाल 85.88 टक्के लागला होता. निकाल कधी लागणार याबाबत जवळपास 15 लाख विद्यार्थ्यांना आणि पालकांना उत्सुकता होती, अखेर आता ही उत्सुकता संपली आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर http://mahresult.nic.in/ विद्यार्थी हा निकाल पाहू शकतात.
विभागनिहाय निकाल कोकण - 95.89 पुणे - 92.50 कोल्हापूर -92.42 अमरावती - 92.09 नागपूर - 91.65 लातूर - 89.79 मुंबई - 89.35 नाशिक - 88.87 औरंगाबाद - 88.18
सर्वांना उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा : मुख्यमंत्रीकोशिश करने वालों की कभी हार नहीं होती : रोहित पवार निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलं आहे. तसंच अनुतीर्ण विद्यार्थ्यांना नाउमेद न होण्याचा सल्ला दिला आहे. रोहित पवार यांनी शायरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं मनोधैर्य वाढवलं आहे. त्यांनी ट्वीट केलं आहे की, "बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! एक मोठा शैक्षणिक टप्पा तुम्ही सर केला असला तरी यानंतर खरी कसोटी आहे, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नाउमेद होऊ नये. लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती।
वर्षा गायकवाड यांच्याकडून मंडळाचे आभार तर राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊनमध्ये बारावीचा निकाल लावण्यासाठी काम करणाऱ्या मंडळाचं, अधिकारी, कर्मचारी, परीक्षक, नियामक, मुख्य नियामक, संस्थाचालक, मुख्याध्यापक, प्राचार्य, शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसंच सर्व संघटनांचे आभार व्यक्त केले आहेत.
त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "इयत्ता 12 वीची लेखी परीक्षा दिनांक 18 फेब्रुवारी, 2020 ते 18 मार्च, 2020 या कालावधीत घेण्यात आली. राज्यात कोविड 19 विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता दिनांक 23 मार्च 2020 पासून राज्यात संचारबंदी/लॉकडाउन जाहीर करण्यात आला. व त्याचा कालावधी वेळोवेळी वाढवण्यात आला. सदर कालावधीत परीक्षोत्तर कामामध्ये अनेक अडचणी निर्माण होत होत्या. मात्र मंडळाचे सर्व अधिकारी व कर्मचारी, परीक्षक, नियामक, मुख्य नियामक, संस्थाचालक, मुख्याध्यापक, प्राचार्य, शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच सर्व संघटना यासर्वांच्या बहुमोल सहकार्यामुळे या कठीण परिस्थितीवर मात करुन मंडळाने ई-12 वीचा निकाल जाहीर केला. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन !
कोकणची पोरं हुश्शार : निरंजन डावखरे बारावी निकालात सर्व नऊ विभागीय मंडळामधून कोकण विभागाचा सर्वाधिक 95.89 टक्के निकाल असून सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा (88.18 टक्के) आहे. विभागनिहाय निकालात बाजी मारणाऱ्या कोकणमधील विद्यार्थ्यांचं भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी अभिनंदन केलं आहे. सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करत त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रफुल्ल पटेल यांच्याकडून अभिनंदन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनीही बारावीच्या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं अभिनंद केलं आहे. तसंच आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
राधकृष्ण विखे पाटील यांच्याकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI