Maharashtra HSC Results 2020 LIVE | राज्याचा बारावीचा निकाल 90.66 टक्के
बारावीचा निकाल आज (16 जुलै) जाहीर होणार आहे. (HSC Results 2020 LIVE Updates | Maharashtra HSC Results 2020) आज दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर http://mahresult.nic.in/ विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. इथे पाहा बारावीच्या निकालासंदर्भात (MAH HSC Results 2020 LIVE Updates) संपूर्ण अपडेट्स...
औरंगाबाद - 88.18 टक्के
बारावी परीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीची, भविष्याची दिशा स्पष्ट होत असते. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पुढील वर्गात प्रवेश घेताना त्यांच्या आवडीचा अभ्यासक्रम निवडावा, पालकांनी त्यासाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण मुभा द्यावी, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीबरोबरंच कौशल्यविकासावर, खेळ-व्यायामाकडेही लक्ष द्यावे, व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास घडवण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता पुन्हा यशस्वी होण्याची जिद्द बाळगली पाहिजे. केवळ एका परीक्षेतील अपयशाने सर्व दारे बंद होत नाहीत. एक दार बंद होते तेव्हा शंभर दारे खुली करण्याची जिद्द बाळगली पाहिजे. जीवनात करण्यासारख्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत. त्यांचा शोध घेऊन आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रवेश घ्यावा व तिथे यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा, असा संदेशही उपमुख्यमंत्र्यांनी समस्त विद्यार्थी मित्रांना दिला आहे.
बारावीचे विद्यार्थी http://verification.mh-hsc.ac.in या वेबसाईटवरुन अर्ज करु शकतील. या अर्जासाठी लागणारी फी सुद्धा आॅनलाईन भरावी लागेल. 16 जुलैला बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर 17 जुलैपासून बारावीचे विद्यार्थी या वेबसाईटवरुन अर्ज दाखल करु शकणार आहेत.
बारावीचा निकाल पाहाण्यासाठी वरील वेबसाईटवर लॉगऑन करता. इथे निकाल पाहण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील. समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल. त्यानंतर निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
या वेबसाईटवर निकाल पाहता येणार?
- www.mahresult.nic.in
- www.hscresult.mkcl.org
- www.maharashtraeducation.com
पार्श्वभूमी
Maharashtra HSC Results 2020 LIVE | कोरोनाचं सावट यंदा विद्यार्थांच्या निकालावरही असल्याचं पाहायला मिळालं. परंतु, अखेर विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपली आहे. आज (16 जुलै) महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर http://mahresult.nic.in/ विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. यंदा 18 फेब्रुवारी ते 18 मार्ट दरम्यान महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. परंतु, कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे निकाल जाहीर होण्यास उशिर झाला. मागच्या वर्षी 28 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. मात्र यावर्षी लॉकडाऊनमुळे बारावीचा निकाल उशिरा जाहीर होत आहे.
Maharashtra HSC Results | बारावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?
बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना खालील संकेतस्थळावर पाहता येतील
http://mahresult.nic.in/
यावर्षी बारावीच्या परिक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एकूण 9923 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती आणि पूर्ण राज्यातील जवळपास 3036 परिक्षा केंद्रांवरुन ही बारावीची परिक्षा घेण्यात आली. यामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी हे विज्ञान शाखेचे होते. विज्ञान शाखेचे 5 लाख 85 हजार 736, कला शाखेचे 4 लाख 75 हजार 134, तर वाणिज्य शाखेचे 3 लाख 86 हजार 784 विद्यार्थी आहेत. व्यावसायीक अभ्यासक्रामाचे 57 हजार 373 विद्यार्थी आहेत. आता या परीक्षेचा आज निकाल लागणार आहे, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -