Maharashtra HSC Class 12 Results : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल (HSC Results) जाहीर झाला आहे. यंदा बारावीचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. यंदाही निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. 96.01 टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर 88.13 टक्क्यांसह मुंबई विभाग तळाशी आहे.
यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी मारली आहे. 93.73 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी 89.14 टक्के आहे.
विभागनिहाय निकाल
कोकण : 96.01
पुणे : 93.34
कोल्हापूर : 93.28
अमरावती : 92.75
औरंगाबाद : 91.85
नाशिक : 91.66
लातूर : 90.37
नागपूर : 90.35
मुंबई : 88.13
कुठे पाहाल बारावीचा निकाल?
विद्यार्थ्यांना बारावीचा निकाल आज दुपारी दोन वाजल्यानंतर बोर्डाच्या वेबसाईट ऑनलाईन पाहता येईलच. शिवाय यंदा 'एबीपी माझा'च्या वेबसाईटवरही बारावीचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.
14 लाख 57 हजार 293 विद्यार्थ्यांनी दिली बारावीची परीक्षा
राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीची बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या काळात आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण राज्यातून 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, अशी माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली. राज्यभरात 3 हजार 195 केंद्रावर ही परीक्षा पार पडली.
कसा पाहाल निकाल?
स्टेप 1 - https://marathi.abplive.com/ वर लॉन ऑन करा
स्टेप 2- बारावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा
स्टेप 3- तिथे असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका
स्टेप 4- तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा (उदा. आईचं नाव SONALI असेल तर तुम्हाला SON लिहावं लागेल)
स्टेप 5- एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल
स्टेप 6- निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा
गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी काय कराल?
दरम्यान निकाल जाहीर झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना आक्षेप असेल किंवा गुणपडताळणीसाठी अर्ज करायचे असेल तर त्यासाठी 26 मे ते 5 जून पर्यंत मुदत असेल. या परीक्षेतील उत्तर पत्रिकांचा झेरॉक्स कॉपी ज्या विद्यार्थ्यांना हव्या असतील त्यांना 26 मे ते 14 जून या कालावधीत महामंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी देखील ऑनलाईन शुल्क जमा करावे लागतील.
संबंधित बातमी
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI