Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
रयत शिक्षण संस्था
विविध पदांच्या २४३ जागांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट – शिक्षण संचालक, सहाय़्यक प्राध्यापक (यात शिक्षण संचालक पदासाठी २ जागा, सहाय्यक प्राध्यापक पदासाठी २४१ जागा आहेत.)
नोकरीचं ठिकाण- नवी मुंबई, पनवेल
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ फेब्रुवारी २०२२
अधिकृत वेबसाईट - rayatrecruitment.com (या वेबसाईटवर गेल्यावर उजव्या बाजूला असलेल्या vacancy details मध्ये Mumbai university detailed advertisement यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल. )
जिल्हाधिकारी कार्यालय रायगड
पोस्ट – विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता ( special assistant public prosecutor)
एकूण जागा – १०
शैक्षणिक पात्रता – विधी शाखेची पदवी, किमान ५ वर्ष फौजदारी प्रकरणं चालवण्याचा वकिलीचा अनुभव
वयोमर्यादा – ३८ वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० फेब्रुवारी २०२२
अधिकृत वेबसाईट - raigad.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर more मध्ये notices मध्ये recruitment वर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची पीडीएफ फाईल दिसेल. डाऊनलोड करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
कर्मचारी राज्य विमा निगम
विविध पदांसाठी महाराष्ट्रात ही भरती होत आहे.
एकूण जागा – ५९४
पहिली पोस्ट - अप्पर डिव्हिजन क्लार्क (युडीसी)
एकूण जागा - ३१८
शैक्षणिक पात्रता – पदवीधर, उमेदवारांना कम्प्युटर ऍप्लिकेशन्सचं ज्ञान आवश्यक
दुसरी पोस्ट- स्टेनो
एकूण जागा – १८
शैक्षणिक पात्रता - १२वी पास किंवा मान्यताप्राप्त बोर्ड आणि विद्यापीठातून समकक्ष असणं आवश्यक आहे.
तिसरी पोस्ट - मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)
एकूण जागा – २५८
शैक्षणिक पात्रता – १०वी उत्तीर्ण
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ फेब्रुवारी २०२२
अधिकृत वेबसाईट - www.esic.nic.in (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment वर क्लिक करा. त्यात तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहीरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI