JEE Mains Result : राष्ट्रीय परीक्षण एजन्सी (एनटीए) नं इंजिनिअरिंगची प्रवेश परीक्षा जेईई-मेन्सचा निकाल मंगळवार रात्री जाहीर केला. जाहीर केलेल्या निकालात एकूण 44 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. तसेच 18 विद्यार्थ्यांना टॉप रँक मिळाले आहेत. शिक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री यासंदर्भात माहिती दिली. दरम्यान, महाराष्ट्रातील अथर्व अभिजीत तांबट जेईई मेन्स परीक्षेत टॉप रँक मिळवला आहे. 




चार टप्प्यांत परीक्षेचं आयोजन 


यावर्षीपासून संयुक्त प्रवेश परीक्षा जेईई-मेन्स परीक्षा वर्षातून चार वेळा आयोजित करण्यात येणार आहे. जेणेकरुन विद्यार्थ्यांना आपल्या गुणांमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळू शकेल. पहिला टप्पा फेब्रुवारीमध्ये आणि दुसरा मार्चमध्ये आयोजित करण्यात आला होता. 


पुढील टप्प्यातील परीक्षा एप्रिल आणि मेमध्ये पार पडणार होत्या. परंतु, देशात कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेमुळे या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. तिसरा टप्पा 20-25 जुलैपर्यंत आयोजित करण्यात आला होता. तर चौथा टप्पा 26  ऑगस्ट ते दोन सप्टेंबरपर्यंत आयोजित करण्यात आला होता. 


9 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग 


एनटीएद्वारे चार परीक्षांमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची एक मेरिट लिस्ट जारी करण्यात आली आहे. असं सांगण्यात येत आहे की, एकूण मिळून 9,34,602 विद्यार्थी परीक्षांमध्ये सहभागी झाले होते. एनटीएनं दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात 6.2 लाख विद्यार्थी उपस्थित राहिले होते. त्यानंतरच्या टप्प्यातील परीक्षांसाठी उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. दुसऱ्या टप्प्यात 5.6 लाख, तिसऱ्या टप्प्यात 5.4 लाख आणि चौथ्या टप्प्यात 4.8 लाख परीक्षार्थी सहभागी झाले होते. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI