मुंबई : लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर बेरोजगारीचं संकट ओढावलं. आता नोकऱ्या कुठे आहेत? या सुशिक्षित बेरोजगारांपुढचा मोठा प्रश्न ओळखूनच एबीपी माझा तुमच्यासाठी घेऊन आलंय. जॉब माझामध्ये विविध क्षेत्रातल्या नोकरीच्या संधी कुठे आहेत, कसा अर्ज करायचा, कुठे संपर्क साधायचा याविषयीची माहिती देण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे. सध्या कर्मचारी भविष्य निधी संघटना, जिल्हा परिषद ठाणे येथे नोकरीची संधी आहे. 


कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO)


विविध पदांच्या 98 जागांसाठी भरती 
पहिली पोस्ट – उपसंचालक
एकूण जागा – 13
शैक्षणिक पात्रता – पदवीधर


दुसरी पोस्ट – सहाय्यक संचालक
एकूण जागा – 25
शैक्षणिक पात्रता - सार्वजनिक निधीच्या लेखा /लेखापरीक्षणात अनुभव महत्वाचा आहे.


तिसरी पोस्ट - सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी
एकूण जागा – 26
शैक्षणिक पात्रता - सार्वजनिक निधीच्या लेखा /लेखापरीक्षणातला अनुभव


चौथी पोस्ट - ऑडिटर
एकूण जागा – 34
शैक्षणिक पात्रता - सार्वजनिक निधीच्या लेखा /लेखापरीक्षणातला अनुभव
अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख – 22 ऑक्टोबर 2021


संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे. ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता - Shri Paritosh Kumar, Regional Provident Fund Commissioner­I (HRM), Bhavishya Nidhi Bhawan, 14 Bhikaji Gama place, New Delhi – ­110066.
अधिकृत वेबसाईट - www.epfindia.gov.in  (या वेबसाईटवर गेल्यावर miscellaneous मध्ये recruitment वर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहीरातीची pdf फाईल दिसेल. डाऊनलोड करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
 
जिल्हा परिषद, ठाणे (विविध पदांच्या 105 जागांसाठी भरती)


पहिली पोस्ट – आरोग्य सेविका (महिला)
एकूण जागा – 94
शैक्षणिक पात्रता - महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील.


दुसरी पोस्ट – आरोग्य पर्यवेक्षक
एकूण जागा – 2
शैक्षणिक पात्रता – विज्ञान शाखेची पदवी
वयोमर्यादा – 18 ते 38 वर्ष
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अधिकृत वेबसाईट - www.thane.nic.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 सप्टेंबर 2021


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI