मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना नोकरीची गरज आहे ते तरुण याठिकाणी अर्ज करु शकतील. तर पाहुयात आज कुठे नोकरीची संधी आहे.
SAMEER (सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च) मुंबई
याठिकाणी ITI अप्रेंटिस प्रशिक्षक पदाच्या एकूण 42 रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. फिटर, टर्नर, मशीनिस्ट, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रोप्लेटर, ड्राफ्ट्समन मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, PASAA, IT & ESM, मेकॅनिक या पोस्टसाठी ही भरती आहे. एकूण 42 जागांसाठी ही भरती आहे.यात फिटरसाठी 5, टर्नरसाठी 2, मशीनिस्टसाठी 4, इलेक्ट्रिशियनसाठी 1, इलेक्ट्रोप्लेटरसाठी 1, ड्राफ्ट्समन मेकॅनिकलसाठी 1, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकसाठी 16, PASAA साठी 9, IT & ESM साठी आणि मेकॅनिकसाठी 1 जागा आहे.
- शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण, ITI
- नोकरीचं ठिकाण- पवई आणि खारघर
- ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- अधिकृत वेबसाईट - www.sameer.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment & training वर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला या संदर्भातल्या जाहीरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2021
विमा लोकपाल परिषद महाराष्ट्र
- पोस्ट – विशेषज्ञ
- एकूण जागा – 49
- शैणक्षिक पात्रता – विमा क्षेत्रातला 10 वर्षांचा अनुभव
- अर्ज ईमेल करायचा आहे. ईमेल आयडी आहे- Specialist.life@cioins.co.in आणि Specialist.general@cioins.co.in
- अधिकृत वेबसाईट - www.cioins.co.in (या वेबसाईटवर गेल्यावर notifications मध्ये तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहीरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 सप्टेंबर 2021
एकलव्य कॉलेज ऑफ फार्मसी तासगाव, सांगली
पोस्ट - प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, शिपाई
- एकूण जागा – 13
- शैक्षणिक पात्रता – अनुक्रमे M.Pharm Ph.D. आणि 10 वर्षांचा अनुभव महत्वाचा आहे, तसंच सहाय्यक प्राध्यापकसाठी M.Pharm, व्याख्यातासाठी B.Pharm/M.Pharm, प्रयोगशाळा तंत्रज्ञसाठी D.Pharm/BSc, शिपाई पदासाठी दहावी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता हवी.
- अधिकृत वेबसाईट - www.sahyadri charitable. Com
- अर्ज तुम्ही पोस्टानेही पाठवू शकता, तसंच मेलही करु शकता.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता - एकलव्य कॉलेज ऑफ फार्मसी, तासगाव-मणेराजुरी रोड, वसुंबे फाटा, महाराष्ट्र – 416312
- ईमेल आयडी आहे- eklavyacop@gmail.com
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 सप्टेंबर 2021
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI