iPhone 13 Launch Event : Apple चा या वर्षीच्या सर्वात मोठ्या लाँच इव्हेंटमध्ये मंगळवारी रात्री  iPad मिनी लॉन्च केला आहे. हा आयपॅड लेटेस्ट फीचर्स सोबत लाँच केला आहे. यामध्ये   A13 BIONIC प्रोसेसर दिला आहे. गेल्या वर्षीच्या आयपॅडपेक्षा हा आयपॅड अधिक वेगवान असणार आहे. अमेरिकेत आजपासूनच याची प्री बुकिंग सुरू होण्याची शक्यता आहे. या आयपॅडमध्ये 122 डिग्री पॉइंट ऑफ व्ह्यूबरोबरच 12 मेगा पिक्सल्सचा अल्ट्रा वाइड कॅमेरा दिला आहे. फ्रंट कॅमेरा एका नव्या सेंटर स्टेज फीचरसह दिला आहे. टिम कुक यांनी नवा आयपॅड लॉन्च केला आहे


आयपॅड मिनीची वैशिष्ट्ये


हा आयपॅड फर्स्ट जनरेशनच्या अॅपल पेन्सिलला सपोर्ट करेल. अॅपलने आपल्या आयपॅडमध्ये टच आयडीबरोबर  8.3 इंचाची स्क्रीन दिली आहे. अॅपलच्या मागील आयपॅडपेक्षा आयपॅड मिनीचा सीपीयू 40 टक्के अधिक वेगवान आहे. आयपॅड मिनी USB-C पोर्ट आहे. तुम्ही या आयपॅडला तुमच्या कॅमरा, लॅपटॉप किंवा इतर अन्य डिव्हाईसला कनेक्ट करू शकता. आयपॅड मिनी  5 जी ला देखील सपोर्ट करते.


अॅपल आयपॅड मिनीचा रिअर कॅमेरा 12 मेगा पिक्सल आहे. तसेच यामध्ये 12एमपी का अल्ट्रा वाइड कॅमेरा देखील आहे. यामध्ये स्टिरीओसोबत एका नवीन स्पिकर सिस्टिम देखील आहे. हा आयपॅड दुसऱ्या पिढीच्या आयपॅड मिनीला देखील सपोर्ट करतो.  आयपॅड मिनी वेगवेगळ्या रंगात उपलब्ध आहे. 


नवीन आयपॅड आजपासून Apple.com/store आणि  Apple Store अॅपवर अमेरिकेसह 28 देशात  विक्रीसाठी उपलब्ध आहे. आयपॅडचे वायफाय मॉडेल 30,900  रुपयांपासून सुरू होणार आहे. तर वाय फाय  + सेल्युलर मॉडेल 42,900 रुपयांपासून सुरू होणार आहे. सिलव्हर आणि स्पेस ग्रे फिनिशींगमधील आयपॅड स्मार्ट कीबोर्ड खरेदी करण्यासाठी वेगळे 13,900 रुपये मोजावे लागणार आहे. आयपॅडचे स्मार्ट कव्हर ब्लॅक, व्हाईट आणि इंग्लिश लेवेंडर रंगात 3,500 रुपयांना उपलब्ध असणार आहे.