Civil Services Main examination : देशात सध्या कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. त्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. काही ठिकाणच्या शाळा बंद झाल्या आहेत. त्यातच ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चिंतेत भर पडली आहे. त्या पार्श्वूभूमीवर शुक्रवारपासून होणारी केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे यूपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. मात्र, बुधवारी केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे यूपीएससीने परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. देशभरातून जवळपास 9,200 विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.


शुक्रवार, 7 जानेवारीपासून सुरू होणारी युपीएससीची मुख्य परीक्षा वेळापत्रकानुसारच पार पडणार आहे, असे स्पष्टीकरण केंद्रीय लोकसेवा आयोगाने शुक्रवारी दिले आहे.  कोरोना रुग्णाची संख्या वाढत चालल्याने ही परीक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थी आणि काही राजकीय नेत्यांकडून होत होती. मात्र, केंद्रीय लोकसेवा आयोगाने परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार असल्याचं सांगितलं आहे.  


असं आहे यूपीएससीचं वेळापत्रक
यूपीएससी मुख्य परीक्षा 7, 8, 9, 15 आणि 16 जानेवारीला आयोजित करण्यात आली आहे. या तारखांना यूपीएससीचे नऊ पेपर्स घेण्यात येणार असून त्यापैकी दोन पेपर्स हे क्वॉलिफाईंग स्वरुपाचे असतील तर इतर सात पेपर्सचे गुण अंतिम यादीसाठी धरण्यात येणार आहेत. या परीक्षेमधून जे परीक्षार्थी उत्तीर्ण होतील त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.




महत्त्वाच्या बातम्या : 



मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI