Indian Army MNS Recruitment 2022 : वैद्यकीय विज्ञान महासंचालनालय (DGMS - Directorate General of Medical Sciences) ने भारतीय सैन्य बीएससी (B.Sc) नर्सिंग 2022 साठी (Indian Army MNS Recruitment) ऑनलाइन अर्ज जारी केला आहे. ज्या महिला उमेदवारांनी नीट 2022 (NEET 2022) साठी अर्ज केला आहे त्यांच उमेदवारांना या कोर्ससाठी नोंदणी करता येईल. नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी NEET 2022 निकालाचा आधार घेतला जाईल. सर्व पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारालाच लष्करी नर्सिंग सेवा (MNS - Military Nursing Services) मध्ये नोंदणी करण्याची संधी दिली जाईल. MNS नोंदणी दरम्यान (MNS 2022), उमेदवारांना वैयक्तिक तपशील, शैक्षणिक तपशील जमा करणे अनिवार्य आहे.


या भरती अंतर्गत देशभरातील 220 जागांवर भरती केली जाईल. हा अभ्यासक्रम चार वर्षांसाठी असेल. इच्छुक उमेदवारांना www.joinidianarmy.nic.in या अधिृत वेबसाईटची मदत घेऊ शकतात. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवाराला आधी  या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल.


शैक्षणिक पात्रता
उमेदवाराने पहिल्या प्रयत्नात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजीमध्ये किमान 50 टक्के गुणांसह मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. या भरती प्रक्रियेअंतर्गत अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. अंतिम निवड झाल्यावर, उमेदवारांना अभ्यासक्रमात सामील होण्यापूर्वी पात्रता परीक्षेसाठीची प्रमाणपत्र सादर करावी लागतील


वयोमर्यादा
या अभ्यासक्रमासाठी इच्छुक उमेदवाराचा जन्म 01 ऑक्टोबर 1997 ते 30 सप्टेंबर 2005 या कालावधीत झालेला असावा.


उंचीची मर्यादा
या भरतीसाठी महिलांची किमान उंची 152 सेमी असावी. डोंगराळ आणि उत्तर-पूर्व उमेदवारांसाठी उंचीमध्ये सूट देण्यात आली आहे. या ठिकाणच्या उमेदवारांसाठी किमान उंची 147 सेमी आहे.


निवड प्रक्रिया
1. NEET स्कोअरच्या आधारे निवड
2. कागदपत्र पडताळणी
3. इंग्रजी आणि सामान्य बुद्धिमत्ता चाचणी
4. मानसशास्त्रीय मूल्यांकन चाचणी (Psychological Aassessment Test)
5. मुलाखत
6. वैद्यकीय परीक्षा


प्रवेशाच्या वेळी उमेदवारांना लष्करी नर्सिंग सेवा देण्यासाठीचा करार किंवा बाँडवर स्वाक्षरी करावी लागेल. प्रशिक्षणाच्या वेळी उमेदवारांना मोफत रेशन, गणवेश भत्ता आणि स्टायपेंड दिला जाईल.


महत्त्वाच्या इतर बातम्या



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI