ICAI CA Foundation Result 2023: चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया संस्थेचा  म्हणजेच ICAI च्या सीए (CA) फाऊंडेशन अभ्यासक्रमाचा निकाल लवकरच जाहीर झाला आहे. हा निकाल (Result) 7 ऑगस्ट रोजी संध्याकाळी जाहीर करण्यात आला आहे.  सीए फाऊंडेशन अभ्यासक्रमाची परीक्षा ही जून महिन्यात घेण्यात आली होती. जून महिन्याच्या 24, 26, 28 आणि 30 तारखेला ही परीक्षा झाली होती.  त्यानंतर या परीक्षेचा निकाल लागण्याची विद्यार्थी वाट पाहत होते. सीए अभ्यासक्रमाचे तीन टप्पे असतात. त्यातील फाऊंडेशन हा पहिला टप्पा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा टप्पा पूर्ण केल्यास त्यांच्या ध्येयाकडे यशस्वी वाटचाल करतात. त्यामुळे सुरुवातीचा हा टप्पा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. 


कुठे आणि कसा पाहाल निकाल?  


विद्यार्थी त्याचा हा निकाल  icai.nic.in या संकेतस्थळावर पाहू शकतात. विद्यार्थ्यांना सुरुवातीला या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. त्यानंतर सीए फाउंडेशन जून 2023 ही लिंक सुरु करा. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर टाकावा लागणार आहे. ही माहिती सबमिट केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना घाबरुन न जाता योग्य माहिती भरुन त्यांचा निकाल पाहावा असं सांगण्यात येत आहे. 


दरम्यान ICAI फाउंडेशनच्या निकालांसाठी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार नसल्याचं सागितलं आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना  70 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत त्यांच्या निकालावर पास विथ डिस्टिंक्शन असा शेरा देण्यात येणार आहे. तसेच ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरमध्ये किमान 40 गुण मिळवणं गरजेचं आहे. तसेच हा टप्पा पार करण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान  50 टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे.  


याआधी 2022 मध्ये जूनमधील सीए फाऊंडेशन परीक्षेचा निकाल हा  10 ऑगस्ट 2022 रोजी जाहीर करण्यात आला होता. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार,  तर या महिन्याच्या सुरुवातील ICAI कडून मे 2023 मध्ये झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट्स फायनल आणि इंटरमिजिएट परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले होते. तसेच यंदा सीए फाऊंडेशनच्या परीक्षा या 24 ते 30 डिसेंबर दरम्यान घेण्यात येणार आहेत. 


दरम्यान विद्यार्थ्यांना उत्तीर्ण झाल्याचं परिपत्रक न देता निकालाचे परिपत्रक देण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकाल घोषित झाल्यानंतर सुमारे  4 ते 5 आठवड्यांनी मेलद्वारे निकाल प्राप्त होणार आहेत. हा निकाल जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून त्यांच्या करिअरच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण टप्पा आता सुरु होणार असल्याचं सांगितलं जात आहे. 


हेही वाचा : 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI