NEET PG Counselling 2023 Result : वैद्यकीय परिषदेच्या समितीने NEET PG समुपदेशनासाठी सुधारित वेळापत्रक जारी केले आहे. उमेदवार आता 04 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत त्यांचे पर्याय भरू शकतात आणि चॉईस लॉकिंग सुविधा 03 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 05 वाजता सुरू होईल आणि 04 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता संपेल. याशिवाय, NEET PG समुपदेशनाच्या पहिल्या फेरीअंतर्गत जागा वाटप 7 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होईल. MCC ने आज सकाळी 10 वाजता NEET PG साठी चॉईस फिलिंगची वेळ निश्चित केली आहे. तर चॉईस लॉकसाठी 4 ऑगस्टपर्यंत वेळही देण्यात आली आहे. यापूर्वी 2 ऑगस्टला नोंदणी आणि निवड आणि फेरी-1 जागा वाटपाचा निकाल 5 ऑगस्टला होणार होता, हा निर्णय आता बदलण्यात आला आहे.


NEET PG साठी चॉईस फिलिंग - 28 जुलै ते 4 ऑगस्ट 


NEET PG साठी चॉईस लॉक प्रक्रिया - 3 ऑगस्ट ते 4 ऑगस्ट


प्रोसेसिंग सीट वाटप 5 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट


पहिल्या फेरी अंतर्गत सीट वाटप 7 ऑगस्ट 


डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची वेळ - 8 ऑगस्ट


रिपोर्टिंग आणि जॉईन होण्याची वेळ 8 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 


17 ते 21 ऑगस्ट दरम्यान दुसऱ्या यादीसाठी प्रवेश


दुसऱ्या वाटप यादीची नोंदणी 17 ते 21 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. जागा वाटप प्रक्रिया 23 आणि 24 ऑगस्ट रोजी उपलब्ध होईल आणि 25 ऑगस्ट रोजी गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. 26 ऑगस्टला कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. 27 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत अहवाल द्यावा लागणार आहे.



  • वैद्यकीय समुपदेशन समिती (MCC) NEET PG समुपदेशनाच्या https://mcc.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जा. 

  • सर्वात आधी मुखपृष्ठावर नवीन नोंदणी आणि उमेदवार लॉग इन पर्याय निवडा. आणि त्यावर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला नोंदणी करणे आवश्यक आहे. 

  • या ठिकाणी तुम्ही तुमची आवश्यक माहिती भरणे आवश्यक आहे. जसे की, तुमचा रोल नंबर, नाव, अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि इतर तपशील भरा. 

  • आता लॉग इन झाल्यानंतर तुमच्या आवडीचे महाविद्यालय आणि अभ्यासक्रम निवडण्यासाठी चॉईस फिलिंग पर्यायात प्रवेश करा. 

  • तुम्ही सिलेक्ट केलेले सर्व पर्याय पुन्हा एकदा तपासा. काही आवश्यक माहिती राहिली असेल तर ती भरून घ्या आणि सबमिट या बटणावर क्लिक करा. 

  • आता या ठिकाणी तुम्हाला आवश्यक रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरायची आहे. 


महत्त्वाच्या बातम्या : 


SWAYAM: स्वयम पोर्टलवर नववी ते मॅनेजमेंट, इंजिनिअरिंगचे 2,100 हून अधिक कोर्स, तेही मोफत; IIM बेंगलोर, AICTE सह नऊ संस्था राष्ट्रीय समन्वयक


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI