How To Become A Millionaire Tips :  आपण खूप श्रीमंत व्हाव असं प्रत्येकालाच वाटत असते. अनेक मध्यमवर्गीय लोकांचे स्वप्न असते की, आपल्याकडे खूप पैसे असावेत. अनेकांची कमाई चांगली असते, मात्र तरीही ते श्रीमंत नसतात. या वर्षात भारतातील 6500 कोट्यधीश इतर देशांमध्ये राहायला गेलेले आहेत आणि आता जगात केवळ 0.7 टक्के लोक लक्षाधीश आहेत. अशा परिस्थितीत आपण देखील या लक्षाधीशांच्या यादीत येण्यासाठी आणि  श्रीमंत होण्यासाठी नेमके काय करावे, पैसे किती आणि कुठे गुंतवावेत, कोणत्या टिप्स फाॅलो कराव्यात ते जाणून घेऊयात.


जर याबाबत तुम्ही भारताचा विचार केला तर अधिकृत आकडेवारीनुसार,140 कोटी लोकांपैकी जवळपास 7,96,000 लक्षाधीश आहेत आणि ते लोकसंख्येच्या फक्त 0.06 टक्के इतके आहे. एकट्या अमेरिकेत सुमारे 2.55 कोटी करोडपती आहेत, तर चीनमध्ये जवळपास 62 लाख आहेत.


वयाच्या पन्नाशी पर्यंत 1 दशलक्ष एवढी संपत्ती बनवणे शक्य होऊ शकते का?


खरे सांगायचे झाले तर हे अतिशय कठीण काम आहे. वयाच्या पन्नाशी पर्यंत 1 दशलक्ष एवढी संपत्ती बनवण्याकरता तारेवरची कसरत करणे फार गरजेचे आहे. जर तुम्हाला अशा प्रकारचे लक्ष्य गाठयचे असल्यास तर अगदी लहानपणापासूनच पैशांची गुंतवणूक करणे फार गरजेचे आहे. मात्र अनेकदा केलेली गुंतवणूक ही घेतलेले कर्ज भरण्यात जाते. परिणामी तुम्ही गुंतवलेले सगळे पैसे खर्च होतात. अशा वेळेस सुरूवातीपासूनच पैशाची गुंतवणूक करणे गरजेचे आहे.


पैसे कसे गुंतवले पाहिजेत?


एक 25 वर्षाचा व्यक्ती ज्याच्या हातात काहूीच वडिलोपार्जीत संपत्ती नाही, मात्र त्याला वयाच्या 50 व्या वर्षी लक्षाधीश व्हायचे आहे त्यायाठी त्याला अंदाजे 35,000 ची मासिक गुंतवणूक सुरू करावी लागेल आणि नंतर पुढील 25 वर्षे ते सुरू ठेवावे लागेल. तर त्या व्यक्तीला असा फायदा होऊ शकतो.





एका 35 वर्षांच्या व्यक्तीला ज्याच्याकडे 50 लाख आहेत, त्याला वयाच्या 50 व्या वर्षी लक्षाधीश व्हायचे आहे. त्याकरता त्याला  1,00,000 ची मासिक गुंतवणूक सुरू करावी लागेल आणि नंतर पुढील 15 वर्षे ते सुरू ठेवावे लागेल. असे केल्यास त्या व्यक्तीकडे वयाच्या पन्नाशी पर्यंत एवढे पैसे जमा होतील.





तर 45 वर्षांच्या व्यक्तीबद्दल देखील बोलूया. त्यांच्या हातात अंदाजे 3 कोटी असणे आवश्यक आहे आणि जर त्यांना वयाच्या 50 व्या वर्षी लक्षाधीश व्हायचे असेल तर ते दरमहा सुमारे 4 लाख रुपये गुंतवण्यास सक्षम असावे लागेल. बहुतेक लोकांसाठी हे खूप कठीण आहे.




 


इतर महत्वाच्या बातम्या


Sovereign Gold Bond 2023-24: आजपासून स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी; ऑनलाईन खरेदीवर 50 रुपयांची सूट, 23 जूनपर्यत गुंतवणूकीची सुवर्णसंधी


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI