Sovereign Gold Bonds Scheme 2023-24 (Series I) : सोन्याच्या किमती (Gold Price Today) या दिवसेंदिवस गगनाला भिडल्या आहेत. अशात जर स्वस्त  सोने घेण्याची संधी मिळत आहे. सॉवरेन गोल्डबाँड या सरकारी योजनेच्या (Government Scheme) माध्यमातून  स्वस्त सोनं खरेदी करता येणार आहे. स्वस्तात सोने खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे पाच  दिवसांचा वेळ आहे. कारण ही योजनेमध्ये गुंतवणूर करण्याची 23 जून ही शेवटची तारीख आहे.  घरातील तिजोरी किंवा बँकेच्या लॉकरमध्ये सोने (Gold) ठेवण्याची जोखीम पत्कारण्यापेक्षा सॉवरेन गोल्ड बॉन्ड हा तुलनेत सुरक्षित पर्याय समजला जातो.


ऑनलाईन पद्धतीने गुंतवणूक केल्यास  50 रुपयांची सूट


सॉवरेन गोल्ड बॉन्ड सीरीजसाठी भारतीय रिझर्व बँकेने 5926 रुपये किंमत निश्चित केली आहे. सॉवरेन गोल्ड बॉन्ड तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने गुंतवणूक करता येणार आहे. जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने गुंतवणूक केल्यास तुम्हाला प्रतिग्रॅम सोन्यापाठी 50 रुपयांची सूट मिळेल.  ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी गोल्‍ड बॉन्‍डचा भाव एक ग्रॅमसाठी  5876 इतका आहे. सध्या सोन्याचा  दर हा सर्व सामान्यांच्या आवाक्यापलीकडे गेला आहे.आज सोन्याचा प्रतितोळा दर 61000 गेला आहे. त्यामुळे सोने खरेदी म्हटलं की पोटात  पोटात गोळा येतो.त्यामुळे  एका सरकारी योजनेच्या माध्यमातून स्वस्तात सोनं  खरेदी करण्याची संधी चालून आली आहे.


योजनेचा कालावधी आठ वर्षाचा 


डिजीटल माध्यमातून गोल्ड बॉण्ड्ससाठी  गुंतवणूकदारांसाठी सबस्क्रिप्शनची किंमत 50 रुपये प्रति ग्रॅमने कमी असणार आहे.सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणुकदारांना वार्षिक 2.5 टक्के व्याज मिळते. सॉवरेन गोल्ड योजनेचा कालावधी आठ वर्षाचा आहे. या योजनेच  लॉक इन  कालावधी पाच वर्षांचा असणार आहे. या योजनेचा प्रीमॅच्युरिटी  रिडेंप्शन पाच वर्ष आणि फुल रिडेंप्शन आठ वर्षांनी होते.  मागील आर्थिक वर्षात सोने खरेदीपेक्षा गुंतवणुकीकडे ग्राहकाचा कल आहे.  या आर्थिक वर्षात सोन्याच्या गुंतवणुकीत 17 टक्के परतावा दिला आहे, त्यामुळे ग्राहकांचा  कल वाढल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.


गोल्ड बॉण्ड कुठून खरेदी करता येईल?


गुंतवणूकदारांना या गोल्ड बॉण्डला स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL) , पोस्ट ऑफिस आणि स्टॉक एक्सचेंज एनएसई आणि बीएसईच्या माध्यमातून खरेदी करता येईल. सुवर्ण रोखेचे जेवढे युनिट खरेदी कराल, त्याच्या मूल्याइतकी रक्कम तुमच्या डिमॅट अकाउंटमधून वजा करण्यात येईल. स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँकेच्या माध्यमातून तुम्हाला सुवर्ण रोखे खरेदी करता येणार नाही. सार्वभौम सुवर्ण रोखे खरेदी योजनेची पहिली सीरिज याआधी 20 जून ते 23 जून 2023 या कालावधीत खुली झाली होती. या दरम्यान गुंतवणूकदारांना स्वस्त दरात सोनं खरेदी करण्याची संधी मिळाली होती. 


 हे ही वाचा :


सोन्यातील गुंतवणुकीचे पर्याय काय आहेत?