Google Doodle : सर्च इंजिन गुगलने युनिस न्यूटन फूट (Eunice Newton Foote) यांच्या 204 व्या जयंतीनिमित्त आज 17 जुलै रोजी एक खास डूडल शेअर केलं आहे. युनिस न्यूटन यांनी ग्रीन हाऊस इफेक्टचा शोध लावला. त्यांचे हे योगदान आपल्या पृथ्वीसाठी खूप महत्त्वाचे आहे. युनिस न्यूटनच्या 204 व्या जयंतीनिमित्त गुगलने स्लाईड शोद्वारे या संदर्भात माहिती दिली आहे. 


ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय?


लहानपणापासून आपण पुस्तकांमध्ये ग्रीन हाऊस इफेक्टबद्दल वाचत आणि ऐकत आलो आहोत. ग्रीन हाऊस इफेक्ट याचा अर्थ पाण्याची वाफ, कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि इतर काही वायूंचा पृथ्वीच्या वातावरणावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. जेव्हा सूर्याची उष्णता पृथ्वीच्या पृष्ठभागावर राहते तेव्हा हरितगृह परिणाम तयार होतो. वायूंमुळे ही उष्णता आकाशापर्यंत पोहोचू शकत नाही. या कारणामुळे आपली पृथ्वी उष्ण राहते आणि हे मानवासाठी फार धोक्याचे आहे. हाच धोका ओळखण्याचे श्रेय 'युनिस न्यूटन' यांना दिले जाते. 


100 वर्ष संशोधनाकडे लक्ष गेलं नाही


युनिस न्यूटन फूट यांचा जन्म 1819 मध्ये कनेक्टिव्ह, न्यू इंग्लंड येथे झाला. विज्ञानाचे ज्ञान असलेल्या युनिस न्यूटन फूट यांनी वायूंचे तापमान आणि तापवण्याचा अभ्यास केला. त्यांना आढळले की, बाहेरील हवेत ऑक्सिजनबरोबर कार्बन डायऑक्साईडचे प्रमाणही खूप जास्त आहे. त्यामुळे उष्णता निर्माण होते आणि ती थंड होण्यास बराच वेळ लागत आहे. त्यांनी अभ्यासात सांगितले की, जेव्हा पृथ्वी सूर्याची उष्णता शोषून घेते तेव्हा काही किरणे मागे जातात आणि काही पृथ्वीवर राहतात.


या दरम्या, सूर्य कार्बन डायऑक्साईड पृथ्वीकडे ढकलतो, जो येथे मोठ्या प्रमाणत राहतो. या प्रक्रियेला ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणतात. ग्रीन हाऊस इफेक्ट वाढल्याने आपल्या पृथ्वीचे तापमानही दिवसेंदिवस वाढत आहे. पण, विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे 100 वर्षांपासून या महत्त्वपूर्ण संशोधनाकडे कोणीही फारसे लक्ष दिले नाही. या संशोधनातून असे दिसून आले की,  वातावरणातील बदल जाणवणे आणि त्याबद्दल विचार करणाऱ्या युनिस न्यूटन फूट या पहिल्या व्यक्ती होत्या.


आज प्रत्येक देशाचे शास्त्रज्ञ पर्यावरण सुधारण्यासाठी संशोधन करत आहेत. आपण आपल्या पृथ्वीबद्दल देखील काळजी घेणं आवश्यक आहे. यासाठी आपल्या आजूबाजूला नेहमी झाडे लावण्याचा प्रयत्न करा. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Italy Airport Strike: युरोपात हजारो भारतीय प्रवासी अडकले, एअरलाईन्स कर्मचाऱ्यांच्या संपाचा प्रवाशांना फटका


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI