एक्स्प्लोर

ITI Equivalence : आयटीआय विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय; थेट SSC आणि HSSC समकक्ष मान्यता देणारे गोवा देशातील पहिले राज्य

Goa ITI Equivalence Decision : गोवा सरकारने आयटीआय विद्यार्थ्यांना थेट 10 वी आणि 12 वी समकक्ष मान्यता देण्याचा मोठा निर्णय घेतला असून अशी घोषणा करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

Goa ITI Education Decision : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कौशल्य विकास क्षेत्रात एक क्रांतीकारी आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यातील पात्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आता थेट माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC 10 वी) आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (HSSC 12 वी) समकक्ष मान्यता देण्याची घोषणा गोवा सरकारने केली आहे. अशी शैक्षणिक व्यवस्था लागू करणारे गोवा हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य ठरले आहे. या निर्णयामुळे आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण, सरकारी नोकऱ्या आणि स्पर्धा परीक्षांचे नवे दरवाजे खुले होणार आहेत.

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त पणजी येथील कला अकादमीत आयोजित एका विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही घोषणा केली. यासोबतच राज्यातील आयटीआय क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी तब्बल 180 कोटींच्या मोठ्या गुंतवणुकीची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. याद्वारे गोव्यातील आयटीआय संस्थांमध्ये आधुनिक पायाभूत सुविधा, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि डिजिटल शिक्षण पद्धती विकसित करून त्यांना जागतिक दर्जाचे बनवले जाणार आहे.

कौशल्य विकासाला मुख्य प्रवाहातील शिक्षणाचा दर्जा

या ऐतिहासिक निर्णयाबाबत बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, "कौशल्याधारित शिक्षणाला मुख्य प्रवाहातील शिक्षणाइतकेच महत्त्व मिळणे ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने आम्ही आयटीआय विद्यार्थ्यांना थेट SSC आणि HSSC समकक्ष मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांना पुढील पदविका (Diploma), पदवी अभ्यासक्रम, सरकारी भरती तसेच शालेय पात्रतेची अट असलेल्या सर्व प्रकारच्या रोजगार संधींचा लाभ घेता येईल."

सामंजस्य करार आणि अधिसूचना जारी

या महत्त्वपूर्ण उपक्रमाला कायदेशीर आणि औपचारिक स्वरूप देण्यासाठी गोव्याच्या कौशल्य विकास व उद्योजकता संचालनालय (DSDE) आणि गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (GBSHSE) यांच्यात एक विशेष सामंजस्य करार करण्यात आला आहे. तसेच या निर्णयाची अधिकृत अंमलबजावणी करण्यासाठी Notification No. GBSHSE/Acad/ITI/2025/1969 आणि जानेवारी 2026 मधील सुधारित अधिसूचनेद्वारे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.

उद्योग क्षेत्राशी भागीदारी आणि 180 कोटींची गुंतवणूक

या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत NASSCOM, अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालय, मापुसा व काकोडा सरकारी आयटीआय, एस. एस. डेम्पो महाविद्यालय आणि नियोजन संचालनालय यांच्यात ५ महत्त्वाचे सामंजस्य करार करण्यात आले. या भागीदारीमुळे विद्यार्थ्यांना उद्योगांमध्ये इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप, ऑन-द-जॉब प्रशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. गोव्यातील सर्व सरकारी आयटीआय हे 100 टक्के ISO प्रमाणित असून, राज्यातील मुलींसाठी आयटीआय शिक्षण पूर्णपणे मोफत करण्यात आले आहे. ही 180 कोटींची गुंतवणूक म्हणजे गोव्याच्या तरुणांच्या उज्ज्वल भविष्यातील गुंतवणूक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

ही बातमी वाचा:

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Embed widget