नागपूर : चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरीची शाश्वती देणाऱ्या 18 महिन्यांच्या कालावधीच्या ॲडव्हान्स डिप्लोमा इन सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग या मोफत अभ्यासक्रमासाठी 17 ते 28 वयोगटातील मुलींनी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत करण्यात आले आहे.


अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय विकास प्रशिक्षण प्रबोधिनी मार्फत हा अभ्यासक्रम घेतला जाणार आहे. उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा देऊन यामध्ये निवड केली जाते. आकांक्षा कौशल्यातून जीवन्नतीकडे या राज्य शासनाच्या महिलांच्या मोफत धोरण अंतर्गत ही संधी दिली जात आहे. बारावी किंवा आयटीआय झालेल्या विद्यार्थिनींनी 10 ते 30 जुलै या कालावधीत होणाऱ्या ऑनलाइन परीक्षेत सहभागी होऊन आपली निवड गुणवत्तेनुसार पक्की करण्याचे आवाहनही जिल्हा कौशल्य विकास विभागाने केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या 9324288721 / 07122531213 या क्रमांकावर संपर्क साधा.


येथे करा अर्ज 


18 महिन्याच्या या अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन परीक्षेसाठी http://bitly.ws/sAa8 या लिंकवर अर्ज करायचा आहे. या ठिकाणी ऑनलाइन परीक्षा घेतली जाते. 


या सुविधा मोफत


परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर निशुल्क प्रशिक्षण निवास व भोजन व्यवस्था, प्रशिक्षण कालावधीमध्ये लॅपटॉप सुविधा, प्रशिक्षित व तज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन, संभाषण कौशल्य व व्यक्तिमत्व विकासावर भर, प्रशिक्षण व मूल्यमापनानंतर नामांकित कंपनी, स्टार्टअपमध्ये रोजगाराची हमी देखील दिली जात आहे. मोठ्या प्रमाणात अन्य जिल्ह्यातून विद्यार्थी यामध्ये सहभागी होत असून नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थिनींनी देखील या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास केंद्र मार्फत करण्यात आले आहे.


Job Majha : पुणे महानगरपालिका, मिरा भाईंदर महानगरपालिका येथे नोकरीच्या संधी, लवकर करा अर्ज


IPO : येत आहे सुला वायनरीचा आयपीओ, कागदपत्रे सेबीकडे केले दाखल


ESIC Recruitment 2022 : कर्मचारी राज्य विमा महामंडळात नोकरीची संधी, असा करा अर्ज


Job Majha : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीमध्ये विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या संपूर्ण तपशील


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI