ESIC Bharti 2022 : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेऊयात.
कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने स्पेशालिस्ट ग्रेड-II कनिष्ठ स्केलच्या 28 रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 26 जुलै आहे. उमेदवार ESIC च्या अधिकृत वेबसाइट www.esic.nic.in वरून अर्ज डाउनलोड करू शकतात. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवरील अधिसूचना वाचावी.
ESIC Recruitment 2022 : रिक्त पदांचा तपशील
या भरती अंतर्गत स्पेशालिस्ट ग्रेड-II कनिष्ठ स्केलच्या 28 रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.
ESIC भर्ती 2022 : अशी असेल निवड प्रक्रिया
या भरतीसाठी मुलाखतीच्या आधारे या पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल.
ESIC Recruitment 2022 : वयोमर्यादा
या भरतीसाठी इच्छुक उमेदवाराचं कमाल वय 45 वर्ष (26 जुलैपर्यंत) असावे.
ESIC भर्ती 2022 : अर्ज शुल्क किती?
या भरती मोहिमेसाठी अर्जदारांना शुल्क भरावे लागेल. उमेदवारांना अर्ज फी म्हणून 500 रुपये भरावे लागतील. SC/ST/PWD/ विभागीय उमेदवार (ESIC कर्मचारी), महिला उमेदवार आणि माजी सैनिक यांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
ESIC भर्ती 2022 : येथे अर्ज पाठवा
उमेदवारांनी योग्यप्रकारे भरलेला आणि स्वाक्षरी केलेला अर्ज 26 जुलैपर्यंत प्रमाणपत्रांच्या स्वयं-साक्षांकित प्रतींसह ऑफलाईन पाठवणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अतिरिक्त आयुक्त/प्रादेशिक संचालक, ESI कॉर्पोरेशन, DDA कॉम्प्लेक्स कम ऑफिस, 3रा आणि 4था मजला, राजेंद्र प्लेस, राजेंद्र भवन, नवी दिल्ली-110008 या पत्त्यावर अर्ज पाठवावा.