CBSE Term 1 Result 2022  : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) घेतलेल्या टर्म-1 परीक्षेत देशातील लाखो विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांच्या निकालाची ते आतुरतेने वाट पाहत आहेत. टर्म-१ च्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. CBSE वर्ग 10 आणि वर्ग 12 टर्म-1 चा निकाल लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे. CBSE टर्म 1 च्या परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये CBSE द्वारे 10 व 12 वीच्या वर्गासाठी घेण्यात आल्या होत्या.


 


सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) च्या इयत्ता 10, 12 टर्म 1 च्या परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी रविवार, 20 फेब्रुवारीपर्यंत निकाल लागण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय. कारण बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने यापूर्वी दोन्ही इयत्तेसाठी निकाल जाहीर करण्याचे संकेत दिले होते. मात्र या आठवड्यात इयत्ता 10, 12 वी या दोन्ही वर्गांसाठी टर्म 1 चा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. एकदा निश्चित झाल्यावर बोर्ड निकालाची तारीख जाहीर करेल. दरम्यान, विद्यार्थ्यांना फक्त अधिकृत वेबसाइट्स फॉलो करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षा बोर्डाने पहिल्यांदा  10 वी आणि 12 वीच्या अंतिम परीक्षा दोन टर्ममध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्याच आला. 


 


 


10वी, 12वी टर्म 1 चा निकाल या आठवड्यात होणार जाहीर, जाणून घ्या सविस्तर


cbse.gov.in, cbseresults.nic.in या बोर्डाच्या वेबसाइट्सवर इयत्ता 10वी, 12वीचे टर्म 1 चा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 10वी, 12वीचे निकाल तपासण्याच्या इतर अधिकृत पद्धतींमध्ये DigiLocker अॅप आणि वेबसाइट – digilocker.gov.in यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, CBSE टर्म 2 च्या परीक्षा 26 एप्रिलपासून ऑफलाइन होणार आहेत. पेपरमध्ये Objective आणि Subjective असे दोन्ही प्रकारचे प्रश्न असतील. CBSE टर्म 1 चा निकाल या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. य संबंधित विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली आहे की, CBSE टर्म 1 निकाल 2022 या आठवड्यात जाहीर होण्याची अपेक्षा आहे. जरी या निकालाची लिंक देण्यात आली नसली तरी, या आठवड्यात काही अधिकृत अपडेट अपेक्षित आहे. कारण बोर्ड अधिकाऱ्याने या आठवड्यात निकालाविषयी पूर्वी मीडियाला सांगितले होते. 


CBSE टर्म 2 परीक्षेसाठी तारीख जाहीर


याआधी, सीबीएसईने टर्म-1 परीक्षेचा निकाल फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्याची चर्चा केली होती, परंतु तसे झाले नाही. त्यानंतर उद्या म्हणजेच 20 फेब्रुवारीला निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इयत्ता 10वी आणि 12वीचे विद्यार्थी 2021-22 च्या टर्म-1 परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइट- cbse.gov.in, cbseresults.nic.in वर पाहू शकतील. सूत्रांकडून मिळालेल्या अपडेटनुसार, CBSE 10वी, 12वीचे निकाल या आठवड्यातच अपेक्षित आहेत, 26 एप्रिल, 2022 ला CBSE टर्म 2 परीक्षेसाठी तारीख जाहीर करण्यात आली आहे. 


ऑबजेक्टिव्ह आणि सबजेक्टिव्ह असे दोन प्रकारचे प्रश्न


कोरोना संकटामुळे मागच्या वेळेप्रमाणे बोर्ड परीक्षा रद्द होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता दुसऱ्या टर्मची डेटाशीट जारी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी भरपूर वेळ मिळणार आहे. दरम्यान 5 जुलै 2021 ला कोरोनामुळे बोर्डाने परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्याची घोषणा केली होती. दुसऱ्या टर्ममध्ये विद्यार्थ्यांना ऑबजेक्टिव्ह आणि सबजेक्टिव्ह असे दोन प्रकारचे प्रश्न विचारण्यात येणार आहे. पहिल्या टर्ममधील परीक्षेत विद्यार्थ्यांना फक्त ऑब्जेक्टिव प्रश्न विचारण्यात आले होते. बोर्डाच्या परीक्षेसाठी सँपल पेपर पॅटर्न फॉलो करण्यात येणार आहे. सँपल पेपर गेल्या महिन्यात सीबीएसईची अॅकडेमिक वेबसाईटवर जारी करण्यात येणार आहे. डेटाशीट लवकरच बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट  cbse.nic.in जारी करण्यात येणार आहे.


 


महत्त्वाच्या बातम्या: 



 



 


 


 


 


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI