Mumbai Congress BMC Election : राज्यात स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसची (Congress) स्वबळाची समीकरणं मुंबईत फिरणार का अशी राजकीय चर्चा आता सुरु झाली आहे. काल झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत बहुतांश नगरसेवक शिवसेनेसोबत (Shiv Sena) युती करण्यास इच्छुक असल्याचा सूर दिसून आला. राज्यात एकत्र असताना मुंबई पालिकेत विरोधात लढणं त्रासदायक ठरणार असल्याचं मत अनेक नगरसेवकांनी व्यक्त केलं आहे. काही नगरसेवकांनी मात्र शिवसेनेसोबत युती झाल्यास अल्पसंख्यांक समाज दुरावण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. 


मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे नगरसेवक शिवसेनेसोबत युती करण्यास इच्छुक आहे अशी माहिती मिळाली आहे. राज्यात एकत्र असताना महापालिका निवडणुकीत विरोधात लढणं त्रासदायक ठरणार असल्याचे मत नगरसेवकांकडून व्यक्त केलं जात आहे. 


काल मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या उपस्थितीत नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती.  वॉर्ड पुनर्रचना शिवसेनेने आपल्यासाठी सोयीस्कर केल्यानं बहुतांश काँग्रेस नगरसेवकांचा सूर बदलला आहे.


काँग्रेसकडून स्वबळाचा नारा


काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या काँग्रेसकडून स्वबळाचा नारा दिला जात आहे. आम्हाला तिसरा पक्ष म्हणतात अशी खंत व्यक्त करत आम्हाला एकट्याला लढू द्या, देखते है किसमे कितना है दम अशी आव्हानाची भाषा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली होती. आम्हाला स्वबळावर लढू द्या असा आग्रह भाई जगताप यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे केली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यानंतर आता भाई जगतापांनीही स्वबळाचा नारा दिला होता.


आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित लढवल्या जातील असं काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी सांगितलं होतं. त्यानंतर शिवसेनेचाही सूर काहीसा तसाच होता. पण महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष मात्र 'एकला चलो' चा नारा देत आहेत. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


 





इतर महत्वाच्या बातम्या


विखे-पवारांच्या संघर्षाची झलक संसदेतही! सुप्रिया सुळे म्हणाल्या 'खाल्ल्या मिठाला जागावं!' तर सुजय विखे पाटील म्हणाले...


आम्हाला एकट्याला लढू द्या, देखते है किसमे कितना है दम! भाई जगताप यांचा स्वबळाचा नारा