मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीनंतर मुंबईकरांवर आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. कारण यावर्षी मुंबई महापालिका मालमत्ता करात वाढ करणार आहे. 15 टक्क्यांपर्यंत ही वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी ही माहिती दिली आहे.


 मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल  म्हणाले, यावर्षी केली गेलेली वाढ पुढील तीन वर्षांसाठी असणार आहे. मालमत्ता करात दर तीन वर्षांनी वाढ केली जाते. मात्र कोरोनामुळं गेली दोन वर्षे मालमत्ता करात वाढ करण्यात आली नव्हती. पण सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यानं मालमत्ता करात पुन्हा वाढ करण्यात येणार आहे.


2021-22 मध्ये मालमत्ता करातून उत्पन्न हे 7 हजार कोटी रूपये अंदाजित केले होते. पण ते कमी करून 4800 कोटीवर आणले गेलंय. त्याचवेळी दुसरीकडं यंदाही 2022-23 साठी पुन्हा मालमत्ता करातून 7 हजार कोटी रूपये मिळतील, असा अंदाज दर्शवला आहे. तसंच 500 चौ.फुटांखालील घरांना मालमत्ता करातून 100 टक्के सूट दिल्यानं 462 कोटी रूपयेही कमी झालेत.



  • आगामी मुंबई महापालिका निवडणुकींच्या तोंडावर  महापालिकेचा अर्थसंकल्प जाहीर, यंदाचा अर्थसंकल्प आतापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अर्थसंकल्पात 17.70% ची वाढ, यंदा 45949 कोटींचा अर्थसंकल्प सादर

  • विकास नियोजन खात्याकडून मिळणारे उत्पन्न 2 हजार कोटी रुपये, असा अंदाजित केला होता. ते 14750 कोटी रुपये इतके सुधारित करण्यात आले आहे. त्यामुळे त्यात 12750 कोटी रुपये इतकी तरतूद 

  • 500 चौ. फुट किंवा त्यापेक्षा कमी चटईक्षेत्र असलेल्या निवासी मालमत्तांना सवलत जवळपास 16,14,000 नागरीकांना मालमत्ता करामधून 100% सवलत. प्रतिवर्षी नागरीकांना देण्यात येणाऱ्या सवलतीची रक्कम ₹462 कोटी इतकी असेल.

  • सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये मालमत्ता करापोटी मिळणारे अंदाजित. उत्पन्न हे 7000 कोटींवरुन 4800 कोटी रुपयांची सुधारीत तरतूद 

  • मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात वाढ, तरी तिजोरीला मात्र गळती, महापालिकेच्या उत्पन्नात मोठी घट, मालमत्ता करातून मिळणारं उत्पन्न 7000 कोटींवरुन 4800 कोटी इतकं सुधारित करण्यात आलंय

  • निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरांसाठी नव्या 'वापरकर्ता शुल्का'ची घोषणा, कचरा निर्मीती करणाऱ्यांना भरावं लागणार शुल्क, वर्षाकाठी वापरकर्ता शुल्कातून 174 कोटींच्या उत्पन्नाचे लक्ष्य

  • मुंबईतील महत्वाचे मोठे प्रकल्प कोस्टल रोड, जीएमएलआर, एसटीपी अशा प्रकल्पांच्या भांडवली खर्चात मोठी वाढ, मागील वर्षाच्या तुलनेत भांडवली खर्चात 56% वाढ, 22646.73 कोटींचा भांडवली खर्च 

  • मुंबई अर्थसंकल्पात कलाकारांसाठी दोन नव्या योजना, तरुण चित्रपट निर्मात्यांना चालना देण्यासाठी 'युनेस्को क्रिएटीव्ह सिटी ऑफ फिल्म', चित्रकलाकारांसाठी बस शेल्टर मोहीम

  • मुंबईकरांना खाऱ्या पाण्यातून गोडे पाणी मिळणार, मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी पाणीपुरवठा व्यवस्थेवर भरीव तरतूद, खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी तयार करण्याच्या नि:क्षारीकरणासाठी 200 कोटींची तरतूद


संबंधित बातम्या: