मुंबई :  सीबीएसई बारावी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतरच देशभरातील विद्यापीठ शिक्षण संस्थांनी पदवीच्या प्रथम वर्ष  अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची अंतिम तारीख ठरवावी, असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाचे देशातील सर्व विद्यापीठांना दिले आहेत. 


अनेक राज्यांमध्ये राज्य मंडळाच्या दहावी बारावी बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर झाल्याने विद्यापीठ शैक्षणिक संस्थांनी पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू केल्या आहेत. मात्र अद्याप सीबीएसई बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही, हा निकाल जाहीर होण्यासाठी आणखी वेळ लागणार असून साधारणपणे महिन्याभराचा वेळ लागू शकतो.  त्यामुळे सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ शैक्षणिक संस्थांमध्ये पदवीच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घेता यावा आणि त्यांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा याचा विचार करून विद्यापीठ शिक्षण संस्थांनी या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेची अंतिम तारीख ठरवावी. या संदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने परिपत्रक काढून देशातील सर्व विद्यापीठांना शैक्षणिक संस्थांना सूचना केल्या आहेत.




कोरोना काळात सीबीएसई बोर्डाने दोन सत्रामध्ये परीक्षा घेतल्या.  पहिल्या सत्राचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या सत्राची परीक्षा एप्रिल-मे महिन्यात झाली. त्यामुळे दोन्ही सत्रांचे निकाल एकत्र करून अंतिम निकाल जाहीर करण्यासाठी पुरेसा वेळ सीबीएसई बोर्डाला लागणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी यूजीसीने हे परिपत्रक काढले आहेत


मुंबई विद्यापीठाची पदवी प्रथम वर्ष प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी 15 जुलै रोजी जाहीर होणार आहे.  राज्यातील इतर विद्यापीठांनी सुद्धा प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केला आहे. त्यामुळे आता सर्व विद्यापीठांना प्रवेश प्रक्रियेची अंतिम तारीख बदलावी लागण्याची शक्यता आहे.


 संबंधित बातम्या :


Mission Admission : शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार? अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची चिंता




 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI