मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं (Central Board of Secondary Education) कडून इयत्ता 9 वी आणि 11 वीच्या डेटा सबमिशनसाठी रजिस्ट्रेशन (CBSE Board Registration 2025) प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासंदर्भात सीबीएसई बोर्डाकडून अधिकृत वेबसाईटवर निवेदनही जारी करण्यात आलं आहे. सीबीएसईकडून ही नोंदणी 2025 च्या परीक्षेसाठी करण्यात येत आहे. तुम्ही cbse.gov.in या अधिकृत वेबसाईटवर ही नोटिस पाहू शकता. 


सीबीएसई इयत्ता 9 वी आणि 11 वीसाठी नोंदणी सुरु


सीबीएसई बोर्डाने निवेदन जारी करत सांगितलं आहे की, इयत्ता 9 आणि इयत्ता 11 वीच्या विद्यार्थ्यांच्या डेटा सबमिशनसाठी (CBSE Board Registration 2025 नोंदणी प्रक्रिया (Registration Process) 12 सप्टेंबरपासून सुरु करण्यात आली आहे. नोंदणी प्रक्रियेची अंतिम तारीख 12 ऑक्टोबर आहे. याआधी नोंदणी करा. 12 ऑक्टोबर नंतर एक दिवसाची अधिक मुदत मिळेल पण, त्यासाठी विलंब शुल्क (Late Fee) भरावे लागेल. दंड भरून तुम्ही 13 ऑक्टोबरपर्यंत रजिस्ट्रेशन करु शकता. 


विलंब शुल्क किती?


सीबीएसई बोर्डाच्या रजिस्ट्रेशनसाठी भारतीय विद्यार्थ्यांना 2300 रुपये विलंब शुल्क भरावं लागेल. तर, परदेशी विद्यार्थ्यांसाठी 2500 रुपये विलंब शुल्क भरावं लागेल. पण, 12 ऑक्टोबरपर्यंत नोंदणी केल्यास दंड भरावा लागणाप नाही. त्यामुळे त्याआधी रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न करा.


फक्त 'हे' विद्यार्थीच सीबीएसई परीक्षेसाठी पात्र ठरतील


ऑनलाइन डेटा सबमिशनद्वारे नोंदणीकृत केलेले विद्यार्थीच 2025 मध्ये इयत्ता 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेला बसू शकतील. ही तयारी पुढील वर्षी होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षांसाठी आहे, त्यामुळे लवकरात लवकर नोंदणी करा. यामध्ये कोणताही निष्काळजीपणा होणार नाही याची सर्व विद्यार्थी आणि पालकांनी काळजी घ्या.


शाळांकडून डेटा सबमिशन


सीबीएसई विद्यार्थ्यांचा डेटा शाळांद्वारे भरला जाईल. OASIS प्लॅटफॉर्मवर डेटा सबमिशन केलं जाईल. डेटा सबमिशनसाठी शाळांना आणखी काही औपचारिकता पूर्ण कराव्या लागतील. या कामात सावधगिरी बाळगावी लागेल कारण अर्ज दुरुस्ती करण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध होणार नाही. त्यामुळे डेटा सबमिशन आणि नोंदणी करताना माहितीची योग्य तपासणी करा आणि काळजी घ्या.


पेपर पॅटर्नमध्ये मोठा बदल


CBSE बोर्डाने 2024 च्या पेपर पॅटर्नमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत. विद्यार्थ्यांना हे नवीन पेपर पॅटर्न समजावेत यासाठी बोर्डाने सॅम्पल पेपर्सचा सेट जारी केला आहे. या सॅम्पल पेपर्सच्या मदतीने विद्यार्थ्यांना (10 वी आणि 12 वी) या वर्षीच्या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील आणि त्यांची मार्किंग स्कीम काय असेल हे सहजपणे कळू शकेल. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आपल्या वेबसाईटवर नवीन नमुने जारी केले आहेत. यावेळी सर्वात मोठा बदल म्हणजे आता 50 टक्के प्रश्न कॉम्पिटेन्सीवर आधारित असतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Google Internship 2024 : गुगलमध्ये इंटर्नशीप करण्याची संधी, 80 हजार पगार; अर्ज कसा आणि कुठे कराल? जाणून घ्या...


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI