CBSE New Sample Papers Released For 10th & 12th : CBSE बोर्डाने 2024 च्या पेपर पॅटर्नमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत. विद्यार्थ्यांना हे नवीन पेपर पॅटर्न समजावेत यासाठी बोर्डाने सॅम्पल पेपर्सचा सेट जारी केला आहे. या सॅम्पल पेपर्सच्या मदतीने विद्यार्थ्यांना (10 वी आणि 12 वी) या वर्षीच्या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील आणि त्यांची मार्किंग स्कीम काय असेल हे सहजपणे कळू शकेल. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आपल्या वेबसाईटवर नवीन नमुने जारी केले आहेत. यावेळी सर्वात मोठा बदल म्हणजे आता 50 टक्के प्रश्न कॉम्पिटेन्सीवर आधारित असतील.


येथून तपासू शकता


जे विद्यार्थी या वर्षीच्या परीक्षेला बसले आहेत ते अधिकृत वेबसाईटवरून PDF डाऊनलोड करू शकतात. पेपर पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना cbseacademic.nic.in. या साईटवर जावे लागेल. 


'हे' मोठे बदल आहेत?


जर आपण नवीन परीक्षा पद्धतीबद्दल बोललो तर आता अधिक विश्लेषणात्मक (Analitical), संकल्पनेवर आधारित प्रश्न (Concept based questions) येतील. प्रश्नांची विविधता MCQ, लहान उत्तरे आणि थोडक्यात उत्तरे सारखीच राहतील. जवळपास 50 टक्के प्रश्नांचे MCQ मध्ये रूपांतर करण्यात आले असून त्यांना एक ते दोन गुण आहेत. तुम्ही वेबसाइटवरून नमुना पेपर आणि मार्किंग स्कीम दोन्ही तपासू शकता.


असे डाउनलोड करा



  • नवीन नमुना पेपर डाउनलोड करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाईटवर cbseacademic.nic.in. या वेबसाईटला भेट द्या.

  • येथे मुख्यपृष्ठावर, प्रश्नावली (Question Bank) नावाचा विभाग शोधा आणि त्यावर क्लिक करा.

  • येथून अतिरिक्त सराव प्रश्नांवर जा आणि क्लिक करा.

  • असे केल्याने एक नवीन पेज उघडेल. या पृष्ठावर तुम्हाला अतिरिक्त सराव प्रश्न दिसतील.

  • विषयानुसार ते येथून डाउनलोड करा आणि तपासा.

  • आता यावेळेस कोणते प्रश्न येतील ते कळेल.



बोर्डाच्या पूर्व परीक्षा काही महिन्यांत सुरू होणार आहेत. ही उत्तम संधी आहे जेव्हा उमेदवार नमुना पेपर डाउनलोड करून नवीन पॅटर्न समजून घेऊ शकत नाहीत तर त्यानुसार तयारी देखील करू शकतात. नवीनतम अद्यतनांसाठी वेबसाईटला भेट देत रहा. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Education : मातृभाषेतून शिक्षण उपलब्ध करुन देण्यास शिक्षण विभाग आग्रही; सप्टेंबरअखेरपर्यंत पाठ्यपुस्तकं मराठीत करण्याच्या विद्यापीठांना सूचना


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI