CBSE Board Exam 2022-23 : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) पुढील शैक्षणिक सत्रापासून दहावी आणि बारावी (CBSE Next Academic Session) साठी एकच बोर्ड परीक्षा आयोजित करण्याच्या जुन्या पद्धतीवर परत जाऊ शकते. पुढील वर्षापासून दहावी आणि बारावीच्या परीक्षा एकदाच घेतल्या जाणार आहेत. यावर्षी देशातील कोरोना व्हायरसच्या संसर्गाची परिस्थिती पाहता बोर्डाची परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला. जे विद्यार्थी संसर्गामुळे एका परीक्षेला बसू शकले नाहीत, त्यांचे गुण दुसऱ्या परीक्षेच्या आधारे मोजले जातील. पण हे धोरण आता सीबीएसईने रद्द केलं आहे.


अभ्यासक्रमात कोणतीही कपात नाही


CBSE ने 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा 2022-23 साठी सुधारित अभ्यासक्रम देखील जारी केला आहे. सीबीएसई अभ्यासक्रमाबाबत बोलताना सीबीएसई बोर्डानेही यापुढे अभ्यासक्रम वाढवण्यावर भर दिला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे सध्या CBSE बोर्डाच्या अभ्यासक्रमात 30 टक्के कपात करण्यात आली आहे, जी यापुढेही सुरू राहण्याची अपेक्षा आहे.


CBSE इयत्ता 10वी आणि 12 बोर्ड परीक्षा 2022-23 चा सुधारित अभ्यासक्रम आता cbseacademic.nic.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. त्याचवेळी, मंडळाने 9वी, 10वी आणि 11वी आणि 12वीसाठी समान अभ्यासक्रम जारी केला आहे. टर्म 1 बोर्ड परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये घेण्यात आली. त्याचबरोबर टर्म 2 ची परीक्षा 26 एप्रिलपासून सुरू होणार आहे. शाळांकडून निवेदन आल्यानंतर बोर्डानं एकच परीक्षा पद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.


CBSE टर्म 2 बोर्ड परीक्षा 2022: मार्गदर्शक सुचना



  • परीक्षा हॉलमध्ये एका वर्गात 12 ऐवजी 18 विद्यार्थ्यांना बसण्याची परवानगी असेल. 

  • सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क आणि तापमान मोजण्यासारख्या सूचना पूर्वीप्रमाणेच आहेत.

  • टर्म 2 प्रश्नपत्रिका कस्टोडियन्सना पाठवल्या जातील.

  • जिओ टॅगिंग आवश्यक असेल.

  • पडताळणी तीन टप्प्यात केली जाईल.

  • परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रावर केंद्र अधीक्षक देखरेख करतील

  • टर्म 2 परीक्षा दोन तासांची असेल. 

  • सकाळी 10:30 ते 12:30 या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे.

  • विद्यार्थ्यांना सकाळी 9.30 पर्यंत परीक्षा केंद्रावर हजर राहावे लागेल. 

  • सकाळी 10.00 नंतर परीक्षा केंद्रावर प्रवेश बंद केला जाईल. 

  • त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही.

  • सकाळी 10:00 वाजता प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका वितरित केल्या जातील. 

  • विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 20 मिनिटे मिळणार आहेत.

  • परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र (CBSE रोल नंबर/अ‍ॅडमिट कार्ड) दाखवावे लागेल. 

  • त्यावर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI