CAT 2022 Admit Card : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM बंगलोर) ने कॉमन अॅडमिशन टेस्ट 2022 (CAT) साठी प्रवेशपत्र जारी केले आहे. प्रवेशपत्रे CAT च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत, जे उमेदवार प्रवेश परीक्षेसाठी बसले आहेच, ते लॉगिन पोर्टलद्वारे त्यांचे प्रवेशपत्र पाहू शकतात, तसेच डाउनलोडही करू शकतात. प्रवेशपत्रासाठी उमेदवारांना त्यांचा यूजर आयडी आणि पासवर्ड आवश्यक असेल.


150 केंद्रांवर परीक्षा केंद्रे स्थापन


CAT परीक्षा ही 27 नोव्हेंबर 2022 रोजी घेतली जाईल. ही परीक्षा इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, बंगळुरूतर्फे घेतली जाईल. परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी देशभरातील सुमारे 150 केंद्रांवर परीक्षा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. उमेदवार खाली नमूद केलेल्या स्टेप्सव्दारे iimcat.ac.in अधिकृत वेबसाइटवरून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यास सक्षम असतील.



तीन शिफ्टमध्ये होणार परीक्षा 
पहिली शिफ्ट - सकाळी 8:30 ते रात्री 10:30 पर्यंत
दुसरी शिफ्ट - दुपारी 12:30 ते दुपारी 2:30 पर्यंत
तिसरी शिफ्ट - दुपारी 4:30 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत



प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?
-प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in ला भेट द्यावी लागेल.
-येथे लॉग इन करा आणि यूजर आयडी पासवर्ड टाका.
-आता येथे डॅशबोर्डमध्ये CAT प्रवेशपत्र 2022 च्या दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
-त्यानंतर प्रवेशपत्र डाउनलोड करा 


-शेवटी उमेदवार CAT 2022 परीक्षेच्या प्रवेशपत्राची प्रिंट काढू शकतात


प्रवेशासाठी दोन-टप्प्यांची प्रक्रिया


CAT निकाल जाहीर झाल्यानंतर, आयआयएम आणि इतर बी-स्कूलमध्ये प्रवेशासाठी, दोन-टप्प्यांची प्रक्रिया असेल - (1) विश्लेषणात्मक लेखन चाचणी (AWT), वैयक्तिक मुलाखत (PI) सर्वप्रथम प्राथमिक तपासणी होईल. त्यामध्ये, ज्या उमेदवाराने क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड (QA), डेटा इंटरप्रिटेशन आणि लॉजिकल रिझनिंग (DILR), आणि व्हर्बल अँड रीडिंग कॉम्प्रिहेन्शन (VARC). त्यांना एकूण पर्सेंटाइलमध्ये शॉर्टलिस्ट केले जाईल.


 


CAT परीक्षा ही IIM आणि इतर बिझनेस स्कूलद्वारे ऑफर केलेल्या मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर आणि इतर कार्यक्रमांमध्ये अॅडमिशनसाठी प्रवेश परीक्षा आहे. CAT परीक्षेच्या उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की, CAT 2022 मध्ये केवळ क्वालिफाय करणे म्हणजे IIM मध्ये प्रवेशाची हमी देत ​​नाही. उमेदवारांच्या निवडीसाठी प्रत्येक संस्थेचे स्वतःचे निकष असतात, ज्यामध्ये वैयक्तिक मुलाखत, गट चर्चा इत्यादीसारख्या पुढील फेऱ्यांचा समावेश असतो.


 


 


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI