एक्स्प्लोर

विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन MCQ पद्धतीने घ्या, अन्यथा...; भाजयुमोचा सरकारला इशारा

Exam : राज्यातील काही विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीन डिस्क्रीप्टिव्ह स्वरुपात होणार आहेत. या परीक्षांना भारतीय जनता युवा मोर्चानं विरोध केला आहे.

BJP Letter To Uday Samant For Exam : राज्यातील काही विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीन डिस्क्रीप्टिव्ह स्वरुपात होणार आहेत. या परीक्षांना भारतीय जनता युवा मोर्चानं विरोध केला आहे. विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता ऑफलाईन MCQ पद्धतीने परीक्षा घ्याव्यात अन्यथा विद्यार्थ्यांबरोबर संघर्षात भारतीय जनता युवा मोर्चाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी सरकारला दिला आहे. 

मंत्री उदय सामंत यांना दिलेल्या पत्रात  म्हटलं आहे की,  शिक्षणमंत्री उदय सामंत विद्यार्थ्यांच्या भावनांशी सुरू असलेला खेळ त्वरित थांबवा. विद्यार्थ्यांची जी मागणी आहे की परीक्षा ऑफलाईन MCQ पद्धतीने व्हाव्यात त्यावर सकारात्मक निर्णय करा. परीक्षा संपूर्ण डिस्क्रीप्टिव्ह घ्यायच्या होत्या तर मग मे महिन्यात का नाही घेतल्या? तसे झाले असते तर जुलै महिन्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करता आले असते!परंतु कोणत्याच प्रकारचे नियोजन शिक्षण मंत्र्यांनी केले नाही आणि आता सर्व विषय कुलगुरूंच्या अंगावर ढकलण्याचे काम उदय सामंत करीत आहेत, असा आरोप भाजयुमोनं केला आहे. 


विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन MCQ पद्धतीने घ्या, अन्यथा...; भाजयुमोचा सरकारला इशारा

निवेदनात म्हटलं आहे की, वाढता कोरोना प्रभाव, ऐन पावसाळ्यात अनेक ठिकाणी उद्भवणारी पूर सदृश परिस्थिती यावर परीक्षांच्या अनुषंगाने शिक्षणमंत्र्यांनी कोणती पूर्व उपाययोजना केली आहे याचे ही उत्तर विद्यार्थी मागत आहेत. लवकर परीक्षा घेऊन लवकर निकाल लावायचे असतील व नवीन शैक्षिणक वर्ष लवकर सुरू करायचे असेल तर विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता ऑफलाईन MCQ पद्धतीने परीक्षा घ्याव्यात अन्यथा विद्यार्थ्यांबरोबर संघर्षात भारतीय जनता युवा मोर्चाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा भाजयुमोनं दिला आहे. 

कोरोना काळात आपण डिजायस्टर अॅक्टचा वापर करत निर्णय विद्यापीठांवर लादला आहे.  प्रत्येक विद्यापीठाच्या परीक्षा वेगवेगळ्या पद्धतीनं होऊ लागल्या तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची तुलना आपण कशी करणार. आपल्या राज्याचे विद्यार्थी इतर राज्यांच्या तुलनेत मागे राहीले तर या पापाची जबाबदारी तुम्ही घेणार का? असा सवाल देखील सामंत यांना भाजयुमोनं केला आहे. 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

MPSC Student Protest: पदभरती कधी करणार? MPSC विद्यार्थ्यांकडून राज्यातील अनेक मंत्री अन् अधिकाऱ्यांना फोनचा तगादा; मेलबॉक्सही फुल, नेमकं प्रकरण काय?
पदभरती कधी करणार? MPSC विद्यार्थ्यांकडून राज्यातील अनेक मंत्री अन् अधिकाऱ्यांना फोनचा तगादा; मेलबॉक्सही फुल, नेमकं प्रकरण काय?
 Maharashtra CET Exams: सोशल मीडियाद्वारे चुकीची माहिती अन् दिशाभूल करणाऱ्यांनो सावधान; CET कक्षाबाबत खोटी माहिती पसरवल्यास थेट कारवाईचा बडगा, टास्क फोर्स ठेवणार लक्ष
सोशल मीडियाद्वारे चुकीची माहिती अन् दिशाभूल करणाऱ्यांनो सावधान; CET कक्षाबाबत खोटी माहिती पसरवल्यास थेट कारवाईचा बडगा, टास्क फोर्स ठेवणार लक्ष
युद्धात जिंकलो आणि तहात हरलो, MPSC आंदोलनातून हाती काहीच पडलं नाही, सुषमा अंधारेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, मंत्री शिवेंद्रराजे आणि रोहित पवारांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?
युद्धात जिंकलो आणि तहात हरलो, MPSC आंदोलनातून हाती काहीच पडलं नाही, सुषमा अंधारेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, मंत्री शिवेंद्रराजे आणि रोहित पवारांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?
Shivendraraje Bhonsle: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना फी माफीचा जीआर, तरीही विद्यार्थ्याकडून सक्तीची फी वसुली? मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंकडून शाळांना थेट इशारा, म्हणाले...
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना फी माफीचा जीआर, तरीही विद्यार्थ्याकडून सक्तीची फी वसुली? मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंकडून शाळांना थेट इशारा, म्हणाले...

व्हिडीओ

Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report
Reliance Jio IPO : रिलायन्स जिओ, रेकॉर्डब्रेक आयपीओ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, तब्बल 56 वर्षानंतर ऑस्ट्रेलियावर फॉलोऑनची नामुष्की
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, नेमकं काय घडलं?
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
South Star Yash On Sai Pallavi In Ramayana: 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? लंकाधिपती रावण साकारणारा यश म्हणाला...
4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? लंकाधिपती रावण साकारणारा यश म्हणाला...
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
Supriya Sule : पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून भाजप उमेदवारांना मतदान करण्यासाठी फोन, ऑडिओ क्लिप शेअर करत सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी
भाजप उमेदवारांना मतदान करा, पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून मतदारांना फोन, सुप्रिया सुळेंकडून ऑडिओ क्लिप शेअर
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
Embed widget