Yavatmal News: वेल्डिंगदरम्यान भीषण स्फोट, उपचारादरम्यान आणखी दोघांचा दुर्दैवी अंत; मृतांचा आकडा पोहचला चारवर; यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड हादरलं!
Yavatmal Umarkhed Cylinder Blast News: यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे झालेल्या स्फोटात आणखी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. परिणामी आता मृतांचा आकडा चारवर पोहचहला आहे.

Yavatmal Umarkhed Cylinder Blast News: यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे झालेल्या स्फोटात आणखी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. परिणामी आता मृतांचा आकडा चारवर पोहचहला आहे. उमरखेड (Umarkhed Cylinder Blast News) येथे बैलबाजार भरणाऱ्या ग्राउंडसमोर ब्लास्टिंग करणाऱ्या ट्रॅक्टरचे वेल्डिंग सुरू असताना सिलेंडरचा अचानक भीषण स्फोट झाला होता. या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. तर पाच जण गंभीर जखमी झाले होते. जखमींना नांदेडसह उमरखेड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात आला होता. अशातच ब्लास्टिंगच्या ट्रॅक्टर वेल्डिंग करताना झालेल्या भीषण स्फोटात मृतकांची संख्या चारवर पोहचली आहे. (Cylinder Blast News)
मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी अविनाश बेले, साजेब खान अनिस खान या दोघांचा मृत्यू झाला होता. तर नांदेड येथे उपचारादरम्यान वैभव बोक्से, शेख जावेद शेख बाबू यांचा मृत्यू झाला आहे. यवतमाळच्या उमरखेड-ढाणकी रस्त्यावर ब्लास्टिंगच्या ट्रॅक्टरला वेल्डिंग करतांना स्फोट झाल्याची घटना काल (26 सप्टेंबर) घडली होती. घटनेत आधी दोघांचा मृत्यू झाला होता, तर पाच जण गंभीर जखमी झाले होते. गंभीर जखमींना नांदेड येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. उपचार सुरू असताना आता मृतांची व्याप्ती वाढली आहे. या अपघातात आणखी दोघांचा मृत्यू झाला असून आता या घटनेत तब्बल चार जणांचा मृत्यू झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या





















