यवतमाळ : कौटुंबिक वादातून एका पोलीस पाटलाची हत्या (Murder) करण्यात आली आहे. ही ही घटना यवतमाळच्या (Yavatmal) कळंब तालुक्यातील खुदानपूर येथे घडली. राजेश नानाजी कोल्हे वय 52 असं या पोलीस (Police) पाटलाचे नाव आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली. विजय रामभाऊ खुडसंगे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. तसेच या संपूर्ण प्ररकणाची चौकशी सध्या पोलिसांकडून करण्यात येत आहे.
जिल्ह्यात सध्या गुन्हेगारीचं सत्र वाढत चालल्याचं चित्र आहे. त्यातच आता पोलिसांवर वार करुन त्यांची हत्या केल्याने नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तसेच दिवसा होणाऱ्या अशा हल्ल्यांमुळे पोलीस प्रशानस देखील सतर्क झाल्याचं पाहायला मिळतय.
नेमकं काय घडलं?
कळंब तालुक्यातील खुदानपूर येथे पोलीस पाटील वास्तव्यास होते. गावातील त्यांच्याच घरासमोर राहणाऱ्या प्रफुल्ल भोयर यांच्यासोबत ते गप्पा मारत उभे होते. त्यांच्याच शेजारी त्यांचे नातेवाईक खुडसंगे कुटुंब राहत आहे. त्यादिवशी विजय खुडसंगे यांनी राजेश कोल्हे यांना चहा पिण्यासाठी घरी बोलावले. राजेश कोल्हे यांना विजय खुडसंगेने कुटुंबातील वादात का पडता असा सवाल विचारला. तसेच विजयने राजेश कोल्हे यांच्यावर त्याच रागातून चाकूने हल्ला देखील केला. या हल्ल्यामध्ये राजेश यांचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत कळंब पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपी विजय खुडसंगे याला अटक करण्यात आली. या प्रकरणात आणखी कोणते खुलासे होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
स्लॅब कोसळून 5 मजूर जखमी
इमारतीचा स्लॅब टाकण्याचे काम सुरु असतानाचा स्लॅब कोसळल्याने पाच मजूर जखमी झालेत. यवतमाळच्या पुसद तालुक्यात ही घटना घडली. दरम्यान ही घटना वसंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असून जखमींना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. रितेश फुलेवार यांच्या इमारतीचे बांधकाम सुरु होते. यामध्ये सय्यद सज्जाद आजाद अली, शेख निजामुद्दीन खुदबोददीन, नाजीम खान नजीर खान, अंकुश शिवाजी कन्हाळे हे मजूर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या बांधकामाचा स्लॅब कमकुवत असल्यामुळे कोसळला असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामळे यामध्ये पोलीस सध्या पुढील तपास करत आहे.