Yavatmal Crime News यवतमाळ : अवैधरित्या दोन जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने   (Yavatmal Police) अटक केलीय. रविवारी सायंकाळच्या सुमारास यवतमाळच्या आर्णी (Yavatmal Crime )येथे ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असतांना गोपनीय माहितीच्या आधारे आर्णी येथील बैल बाजाराजवळ एक इसम गावठी पिस्टलसह उभा असल्याची माहिती मिळाली.


या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (Yavatmal Crime News) घटनास्थळ गाठून इसमाची तपासणी केली असता, त्याच्या जिन्सपॅन्टचे डाव्या बाजुला एक देशी बनावटीची पिस्टल आणि दोन जिवंत काडतुस आढळून आले. याप्रकरणी अयाजुद्दीन काझी शमशुद्दीन काझी (20 वर्षे रा. काळी दौलत खान, ता. महागाव. जि. यवतमाळ) याला अटक करण्यात आली आहे.


देशीकट्टा आणि  दोन जिवंत काडतुस जप्त 


एकीकडे राज्यात सातत्याने गोळीबार आणि हत्येच्या घटना घडत आहेत. त्यामुळे राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न एरणीवर आल्याचे बोलले जात आहे. अशातच गोळीबारांच्या घटनेत हल्ली मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. इतर राज्यातून कमी किमतीत गावठी बंदूक सारखे शस्त्र सहज उपलब्ध होत असल्याने गुन्हेगारी विश्वात या गावठी कट्टा आणि इतर शस्त्रांचा वापर सर्रास होताना दिसत आहे. अशीच एक कारवाई यवतमाळ पोलिसांनी उघडकीस आणली आहे.


यवतमाळच्या आर्णी येथील बैल बाजाराजवळ एक इसम गावठी पिस्टलसह उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या  माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळ गाठून इसमाची तपासणी केली असता, त्याच्या जवळ एक देशी बनावटीची पिस्टल आणि दोन जिवंत काडतुस आढळून आले. याबाबत पोलिसांनी अधिक विचारणा केली असता या पिस्टल आणि दोन जिवंत काडतुससाठी लागाणार परवाना नसल्याने पोलिसांनी या इसमाला अटक केली आहे. सोबतच पिस्टल आणि काडतुस असा एकूण 52 हजाराचा मुद्देमाल जप्त करुन संशयित आरोपी विरुध्द आर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


जिल्ह्यात अवैध शस्त्रांचा सुळसुळाट?


अशीच एक कारवाई काही दिवसांपूर्वी यवतमाळच्या उमरखेड-महागाव रोडवरील संजेरी धाब्याजवळ करण्यात आली होती. ज्यात अवैधरित्या दोन जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने अटक केली होती. 14 फेब्रुवारीच्या पहाटेच्या सुमारास उमरखेड-महागाव रोडवरील संजेरी धाब्याजवळ एक इसम गावठी पिस्टलसह येणार असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून इसमाची तपासणी केली असता, 30 हजार रुपये किंमतीचा देशीकट्टा आणि दोन जिवंत काडतुस त्याच्या कडे आढळून आले. याप्रकरणी ताईफखान जहांगिरखान पठाण (21 वर्षे रा. सवेरा कॉलनी, प्रिन्स गॅरेज उमरखेड) याला अटक करण्यात आली होती. 


पोलिसांच्या चौकशी दरम्यान त्याला देशीकट्टा आणि दोन जिवंत काडतुस बाबत विचारणा केली असता संशयित आरोपी ताईफ खान जहांगीर खान पठाण याने मागील तीन वर्षापूर्वी अमजदखान सरदार खान (रा.पुसद ) याच्याकडून एक देशी कट्टा आणि दोन जिवंत काडतुस खरेदी केल्याचे सांगीतले.  मात्र त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याने पोलिसांनी ताईफखान जहागीर खान पठाण आणि अमजद खान सरदार खान या दोघांविरोधात पीएसआय अमोल राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत अटक केली होती. त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे नेमक्या या घटनेशी जाऊन मिळतात का याचा तपास देखील पोलीस करत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या :