Nitish Bharadwaj Controversy : छोट्या पडद्यावरील 'महाभारत' (Mahabharat) या लोकप्रिय मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारणाऱ्या नितीश भारद्वाज (Nitish Bharadwaj) यांच्या खऱ्या आयुष्यात आता महाभारत घडत आहे. नितीश भारद्वाज यांचा आजही मोठा चाहतावर्ग आहे. सध्या ते कोणत्याही सिनेमामुळे चर्चेत नसून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. पत्नी स्मिता गेट यांच्याविरोधात त्यांनी पोलिसांत धाव घेतली आहे. घटस्फोटाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मुलांवरुनदेखील दोघांमध्ये वाद सुरू आहेत. दरम्यान मुलींना वडील म्हणून हाक मारायला लाज वाटते असं भारद्वाज म्हणाले आहेत. 


नितीश भारद्वाज यांनी 'टेली टॉक इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत लग्नाबद्दल भाष्य केलं. भारद्वाज म्हणाले,"या लग्नाचा मला खूप त्रास झाला आहे. पत्नीने मुलांचे अपहरण केले आहे. पत्नीपासून विभक्त झाल्याने माझी मुलंदेखील मी गमावली आहेत".


नितीश भारद्वाज पुढे म्हणाले,"माझ्या 11 वर्षीय मुलीने मला सांगितलं की तिला  बाबा अशी मला हाक मारायलाही लाज वाटते. मुलांसाठी आज एवढं करुनही ते असं बोलत असतील तर त्याचा त्रास होतो. आई-वडिलांच्या विभक्त होण्याचा परिणाम मुलांवरदेखील होत असतो. पण यासर्व गोष्टींमधून मार्ग काढला पाहिजे. सध्या मी अध्यात्मिकता, ध्यान आणि जवळच्या मित्रांच्या मदतीमुळे यातून बाहेर पडत आहे". 


नितीश भारद्वाज पुन्हा लग्नबंधनात अडकणार? 


नितीश भारद्वाज लग्नाबद्दल बोलताना म्हणाले,"लग्न या गोष्टीने मला धोका दिला आहे. माझी लढाई मुलांसाठी आहे. आता कोणत्या महिलेसोबत संसार थाटावा अशी माझी इच्छा नाही. लग्नासारख्या गोष्टीत विश्वास असायला हवा. या विश्वासामुळेच माझ्या आई-बाबांनी सुखाचा संसार केला होता". 






छोट्या पडद्यावरील श्रीकृष्णाने दोनदा थाटलाय संसार 


नितीश भारद्वाज दोनवेळा लग्नबंधनात अडकले आहेत. स्मिताआधी त्यांनी मोनिशा पाटीलसोबत लग्न केलं होतं. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर 2005 मध्ये ते विभक्त झाले. पुढे भारद्वाज यांनी 2009 मध्ये स्मितासोबत संसार थाटला. आता त्यांच्या नात्यात दुरावा आला आहे.


नितीश भारद्वाज यांच्याबद्दल जाणून घ्या.. (Nitish Bharawaj Details)


नितीश भारद्वाज यांनी महाभारत, विष्णु पुराण, गीता रहस्य, रामायण अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ते अभिनेता असण्यासोबत दिग्दर्शक आणि सिने-निर्मातादेखील आहेत.


संबंधित बातम्या


Nitish Bharadwaj : छोट्या पडद्यावरील श्रीकृष्णाच्या घरी 'महाभारत'; IAS पत्नीविरोधात पोलिसांत धाव, मुलींचे अपहरण केल्याची तक्रार