Yavatmal Crime News यवतमाळ: अवैधरित्या दोन जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने (Yavatmal Police) अटक केली. सोमवारी पहाटेच्या सुमारास यवतमाळच्या (Yavatmal Crime News) उमरखेड-महागाव रोडवरील संजेरी धाब्याजवळ ही कारवाई करण्यात आली. या धाब्याजवळ एक इसम गावठी पिस्टलसह येणार असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला (Yavatmal Crime News)मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून इसमाची तपासणी केली असता, 30 हजार रुपये किंमतीचा देशीकट्टा आणि दोन जिवंत काडतुस आढळून आले. याप्रकरणी ताईफखान जहांगिरखान पठाण (21 वर्षे रा. सवेरा कॉलनी, प्रिन्स गॅरेज उमरखेड) याला अटक करण्यात आली आहे.
देशीकट्टा आणि दोन जिवंत काडतुस जप्त
एकीकडे राज्यात सातत्याने गोळीबार आणि हत्येच्या घटना घडत आहेत. त्यामुळे राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न एरणीवर आल्याचे बोलले जात आहे. अशातच गोळीबारांच्या घटनेत हल्ली मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. इतर राज्यातून कमी किमतीत गावठी बंदूक सारखे शस्त्र सहज उपलब्ध होत असल्याने गुन्हेगारी विश्वात या गावठी कट्टा आणि इतर शस्त्रांचा वापर सर्रास होताना दिसत आहे. अशीच एक कारवाई यवतमाळ पोलिसांनी उघडकीस आणली आहे.
यवतमाळच्या उमरखेड शहरातील महागाव रोडवरील संजेरी धाब्याजवळ एक इसम गावठी पिस्टलसह येणार असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून इसमाची तपासणी केली असता त्याच्या जवळ 30 हजार रुपये किंमतीचा देशीकट्टा आणि दोन जिवंत काडतुस आढळून आले. याप्रकरणी ताईफखान पठाण याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल
पोलिसांच्या चौकशी दरम्यान त्याला देशीकट्टा आणि दोन जिवंत काडतुस बाबत विचारणा केली असता संशयित आरोपी ताईफ खान जहांगीर खान पठाण याने मागील तीन वर्षापूर्वी अमजदखान सरदार खान (रा.पुसद ) याच्याकडून एक देशी कट्टा आणि दोन जिवंत काडतुस खरेदी केल्याचे सांगीतले. मात्र त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याने पोलिसांनी ताईफखान जहागीर खान पठाण आणि अमजद खान सरदार खान या दोघांविरोधात पीएसआय अमोल राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड यांनी केली. या प्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे. ताईफखानने हे हत्यार खरेदी करण्यामागील नेमका काय उद्देश होता याचा तपास सध्या पोलीस करीत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या